Thu, Jul 18, 2019 06:05होमपेज › Marathwada › पाईपलाईन दुरुस्त झाल्याने शहराचा पाणीपुरवठा सुरू

पाईपलाईन दुरुस्त झाल्याने शहराचा पाणीपुरवठा सुरू

Published On: Apr 07 2018 1:38AM | Last Updated: Apr 07 2018 12:36AMअंबासाखर : प्रतिनिधी 

एका कंपनीचे केबल जमिनीत पुरण्यासाठी जेसीबीचा वापर झाल्याने  पाणीपुरवठा करणार्‍या लोखंडी व सिमेंटच्या पाईपलाईनचे तुकडे झाले  होते. या कामाची नुकसानभरपाई  कंत्राटदाराकडून करवून घेतल्यानंतर अंबाजोगाईला पाणी पुरवठा सुरू  झाला. मांजरा धरणातून केज, कळंब, धारुर, लातूरसह अंबाजोगाई शहराला पाणीपुरवठा होतो. दरवर्षी फक्‍त अंबाजोगाई शहरातच पिवळ्या रंगाचे पाणी कसे येते? असा प्रश्‍न उपस्थित झाला होता. अंबाजोगाईकरांना अंबा कारखान्यावर असणार्‍या जलशुद्धीकरण केंद्रावरून जलसाठा होणार्‍या टाकीपर्यंत पाणीपुरवठा करण्यासाठी तीन पाईप लाईन आहेत. त्यापैकी दोन लोखंडी व एक सिमेंटची पाईपलाईन आहे. दोन दिवसांपूर्वी, एका हॉटेलपासून थोड्या अंतरावर एका कंपनीच्या केबलसाठी नाली जेसीबीने खोदत असताना जेसीबीच्या कामामुळे किमान तीस चाळीस फूट सिमेंटच्या पाईपलाईनचे तुकडे झाले होते.

घटनेची माहिती मिळताच मुख्याधिकारी आशिष लोकरे, पाणीपुरवठा विभागाचे कामकाज पाहणारे शाखा अभियंता काळे, स्वच्छता विभागप्रमुख अनंत वेडे, सुपरवायझर कुरे तातडीने घटनास्थळाची माहिती घेऊन एअरटेल कंपनी व काम करणार्‍या कंत्राटदाराविरुद्ध  कार्यवाही  करण्याच्या तयारीत होते.  समोपचाराने दुरुस्तीसाठी लागणार्‍या खर्चाची भरपाई करण्याची तयारी नव्हे खर्च केल्यानंतर सीओंनी  स्थळावर थांबून  लोखंडी पाईप जोडून घेतले व त्यानंतर पाणीपुरवठा सुरळीत सुरू झाला.

Tags : Marathwada, citys, water supply, started due, repair,  pipeline