Fri, Sep 21, 2018 00:23होमपेज › Marathwada › मुलाने लावली पित्याच्या घराला आग

मुलाने लावली पित्याच्या घराला आग

Published On: Dec 04 2017 9:25AM | Last Updated: Dec 04 2017 9:24AM

बुकमार्क करा

नांदेड :

वाटणी देत नसल्याच्या कारणावरून पुत्रानेच पित्याच्या घराला रागाच्या भरात आग लावल्याची घटना शहरातील हनुमानगड परिसरातील विेशनाथनगर शुक्रवारी घडली आहे. वाटणीच्या कारणावरून पिता-पुत्रामध्ये गत अनेक दिवसांपासून भांडणे चालू होती. शुक्रवारी मध्यरात्री साहेबराव लालू सूर्यवंशी व त्यांचा मुलगा बालाजी साहेबराव सूर्यवंशी यांच्यात कडाक्याचे भांडण झाले. या भांडणाचा राग मनात धरत बालाजी सूर्यवंशी याने त्याचे वडील राहत असलेल्या हनुमानगड परिसरातील विेशनाथनगर येथील घराला आग लावण्याचा प्रयत्न केला. या आगीत साहेबराव सूर्यवंशी यांचे दार व चौकट जळून खाक झाले.