Thu, Jun 27, 2019 15:45होमपेज › Marathwada › लातूर : राज्य मागासवर्गीय आयोगाकडून मराठा अरक्षणा संदर्भात सुनावणी सुरु 

लातूर : राज्य मागासवर्गीय आयोगाकडून मराठा अरक्षणा संदर्भात सुनावणी सुरु 

Published On: Feb 26 2018 2:27PM | Last Updated: Feb 26 2018 2:27PMलातूर : प्रतिनिधी

मराठवाड्यात राज्य मागासवर्गीय आयोगाकडून मराठा अरक्षणासंदर्भात जन सुनावणी लातुरातून त्याची सोमवारी सुरुवात झाली. औसा रोड रेस्ट हाऊस वर सकाळी 11 वाजता सुरू झालेली ही सुनावणी दुपारी 4 वाजेपर्यंत चालणार आहे. आयोगाच्या सदस्यात डॉ राजेश कर्पे, डॉ रोहिदास जाधव,  यांचा समावेश आहे.

जनसुनावणी दरम्यान अनेकांनी  समाजाची सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक वयथा मांडली. अर्ज , निवेदने, पुरावे  सादर केली. दलित, मातंग, लिंगायत समाज संघटनानेही मराठा समाजाच्या आरक्षण देण्यात यावे म्हणून निवेदन दिली. मराठा समाजाचे मागासलेपण मांडले. प्राचार्य डॉ बी आर बोडके यांनी विधारत्याचे वास्तव सांगितले. सामाजिक व आर्थिक मागासलेपनमुळे त्यांच्या शिक्षणाची होणारी परवड त्यानी सांगितली.विद्याधर कांदे पाटील, वयकट शिंदे, डॉ हर्षवर्धन राऊत, रामचंद्र सूर्यवंशी, विकास कदम, छावा संघटनेचे विजय घाडगे, लष्कर ए भीमा संघटनेचे रणधीर सुरवसे, लोकनायकचे किसन कदम, ऍड शहाबादे, आदींसह अनेकांनी मराठा समाजाला आरक्षण देण्याची आवश्यकता सांगितली. भिसे वाघोली येथील मोहिनी भिसे या आत्महत्याग्रस्त मुलीच्या आईला मनोगत वयक्त करताना अश्रू अनावर झाले होते. 

मराठवाड्यातील सुनावणी कार्यक्रम

मराठवाड्यात 16 मार्च पर्यंत सुनावणी होणार आहे. त्याचा कार्यक्रम असा राहणार आहे 27 फेब्रुवारी उस्मानाबाद, 5 मार्च नांदेड, 6 मार्च परभणी, 7 मार्च हिंगोली, 8 मार्च बीड, 9 मार्च जालना, 16 मार्च औरंगाबाद .  यापूर्वी मराठवाड्यातील गाव सर्वेक्षण झाले आहे यासाठी प्रत्येक जिल्ह्यातील 2 तालुके व तालुक्यातील दोन गावे निवडण्यात आली होती। 76 पैकी 68 तालुक्यातील 136 गावांत सर्वेक्षण पूर्ण झाले आहे असल्याचे आयोगाचे सदस्य डॉ राजेश कर्पे यांनी पुढारीशी बोलताना सांगितले.