Sun, Jul 21, 2019 12:29होमपेज › Marathwada › शिक्षणाची वारी, त्यात शिक्षकांची हाणामारी

शिक्षणाची वारी, त्यात शिक्षकांची हाणामारी

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

माजलगाव : प्रतिनिधि 

शिक्षण विभाग पंचायत समितीच्यज्ञवतीने शनिवारी शहरातील जिल्हा परिषद मुलांच्या शाळेत शिक्षणाची वारी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या शिक्षणाच्या वारीतच दोन शिक्षकांत हाणामारी झाली. कार्यक्रम चालू असतानाच व्यासपीठावर महिलेने जाऊन गटविकास अधिकारी बी. टी. चव्हाण यांनी 15 हजार रुपये घरकुलासाठी घेतल्याचा आरोप केला. यामुळे चालू कार्यक्रम अर्ध्यातच गुंडाळावा लागला.

पुढील वर्षीच्या शैक्षणिक नियोजन करण्यासाठी शाळा व्यवस्थापन समितीची बैठक घेऊन शिक्षणाची वारी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. शिक्षक व शाळा व्यवस्थापन समिती यांनी दर्जेदार, गुणवत्तापूर्ण, आनंददायी शाळा भरण्याचा ध्यास मनी धरावा हे शिक्षणाच्या वारी या उपक्रमाचा मूळ उद्देश आहे. या कार्यक्रमात तालुक्यातील 25 शाळांनी विविध शैक्षणिक साहित्याचे प्रदर्शन मांडले होते. या कार्यक्रमाचे उद्घाटन दुपारी 12 वाजता सभापती जयदत्त नरवडे, गटविकास अधिकारी बी. टी. चव्हाण, गटशिक्षण अधिकारी बी. के. नांदुरकर, आर. व्ही. महामुनी यांच्या उपस्थितीत झाले.   सभापती मनोगत व्यक्त करण्यासाठी जागेवरून उठले. त्याचवेळेस देवखेडा येथील ज्योती वाघमारे या महिलेने व्यासपीठावर जाऊन गटविकास अधिकारी बी. टी. चव्हाण यांना घरकुलासाठी तुम्ही मला 15 हजारांची मागणी केली होती ती पूर्ण करण्यासाठी माझ्याकडील शेळ्या विकून त्याची भरपाई केली, परंतु तुम्ही माझे घरकुलाचे काम का केले नाही? अशा प्रश्‍न उपस्थित केला.

यामुळे एकच गोंधळ उडाला व कार्यक्रम गुंडाळण्यात आला. नंतर समजूत काढत त्या महिलेस पंचायत समिती कार्यालयात नेण्यात आले.  यानंतर उपस्थित सर्व शिक्षणाची वारीमध्ये मांडण्यात आलेल्या स्टॉलची पाहणी करण्यासाठी निघाले. स्टॉलजवळ थांबलेले सावरगाव केंद्रिय प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक नवनाथ राऊत व नित्रूड जि. प. शाळेचे सहशिक्षक अरुण धस या दोन शिक्षकांत हाणामारी झाली. शिक्षणाच्या वारीत व वरिष्ठांच्या उपस्थितीत शिक्षकांची हाणामारी झाल्याने चांगलाच तमाशा पहावयास मिळाला.

Tags : Marathwada, Marathwada News, Shikshanachi Wari,  program, organized, Zilla Parishad, Childrens School


  •