Tue, Jul 23, 2019 02:39होमपेज › Marathwada › ऑनलाइन हरभरा खरेदी रखडली

ऑनलाइन हरभरा खरेदी रखडली

Published On: Mar 15 2018 1:19AM | Last Updated: Mar 14 2018 11:06PMआर्वी : प्रतिनिधी

हरभरा उत्पादकतेचे एकरी प्रमाण कृषी विभागामार्फत प्राप्त नसल्याने, ‘नाफेड’ मार्फत हरभरा खरेदी अद्याप सुरू करण्यात आली नाही. सरासरी उत्पादकतेच्या आधारे एकरी हरभरा खरेदीचे प्रमाण प्राप्त झाले नसल्याने आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत जिल्ह्यात हरभरा खरेदी अडकली आहे. नाफेडमार्फत हरभरा खरेदी केंद्र सुरू करण्यात आली नसल्याने, बाजारात मिळणार्‍या कमी दरात हरभरा विकण्याची वेळ जिल्ह्यातील हरभरा उत्पादक शेतकर्‍यांवर आली आहे.

आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत ‘नाफेड’मार्फत प्रतिक्विंटल 4 हजार हजार 400 रुपये प्रतिक्विंटल दराने हरभरा खरेदी करण्यात येणार आहे. त्यासाठी जिल्ह्यात हरभरा खरेदीसाठी ‘ऑनलाइन’ नोंदणी सुरू करण्यात आली आहे; परंतु नाफेडमार्फत हरभरा खरेदीत शेतकर्‍यांकडून एकरी किती हरभरा खरेदी करावी, यासंदर्भात हरभरा उत्पादकतेचे एकरी प्रमाण शासनाच्या कृषी विभागामार्फत अद्याप प्राप्त झाले नाही. त्यामुळे नाफेडमार्फत हरभरा खरेदी अद्याप सुरू करण्यात आली नाही. 

रब्बी हंगामातील हरभरा पिकाच्या कापणीनंतर, तयार करण्यात आलेला हरभरा शेतकर्‍यांच्या घरात आला आहे. महिन्याचा कालावधीत उलटून गेला; मात्र नाफेडमार्फत हरभरा खरेदी सुरू करण्यात आली नाही. 

त्यामुळे बाजारात मिळणार्‍या कमी दरात हरभरा विकण्याची वेळ जिल्ह्यातील हरभरा उत्पादक शेतकर्‍यांवर आली आहे. त्यामुळे हरभरा उत्पादकतेचे एकरी प्रमाण कृषी विभागामार्फत केव्हा प्राप्त होणार आणि नाफेडमार्फत आधारभूत किंमत दराने हरभरा खरेदी केव्हा सुरू होणार, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.