Wed, Jan 23, 2019 16:56होमपेज › Marathwada › उपोषणासंदर्भात मुख्यमंत्र्यांना साकडे

उपोषणासंदर्भात मुख्यमंत्र्यांना साकडे

Published On: Jul 14 2018 12:55AM | Last Updated: Jul 14 2018 12:55AMपरभणी : प्रतिनिधी

पीकविमाप्रश्‍नी अद्याप कोणतेही ठोस आश्‍वासन मिळाले नाही. याबाबत सभागृहात प्रश्‍नही उपस्थित झाला. गेल्या तिन दिवसांपासून सभागृहाचे कामकाज बंद होत असल्याने तो विषय चर्चेस येऊ शकला नाही. त्यामुळे आ.डॉ. राहुल पाटील यांनी 13 जुलै रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची  भेट घेतली.

याबाबत येत्या दि. 16 जुलै रोजी शेतकर्‍यांचे प्रतिनिधी व जिल्ह्यातील सर्व आमदारांची बैठक बोलावून मुख्यमंत्री   यांनी उपोषण शेतकर्‍यांची मध्यस्थी करून चर्चेसाठी बोलवावे व त्यांचे म्हणणे  ऐकून सकारात्मक तोडगा काढावा अशी विनंती  केली. याबाबत मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक पवित्रा घेतला असून लवकरच शेतकर्‍यांशी चर्चा करू असे आश्‍वासन दिल्याचे आ. डॉ. पाटील यांनी सांगितले. यावेळी आ.डॉ. मधुसूदन केंद्रे,  जि.प. सदस्य रवी पतंगे,  माजी नगरसेवक नवनीत पाचपोर, शरद हिवाळे, अभय कुलकर्णी उपस्थित होते. खरिप हंगामातील पीकविम्याचा परतावा मिळाला नसल्याने जिल्ह्यातील हजारो शेतकरी 26 जूनपासून  उपोषणास बसले. यातील काही शेतकर्‍यांनी अन्न व पाणी वर्ज्य केले आहे.