Wed, Jun 26, 2019 11:31होमपेज › Marathwada › तेंदू संकलनातून मिळाला अठ्ठाविसशे कुटुंबांना रोजगार

तेंदू संकलनातून मिळाला अठ्ठाविसशे कुटुंबांना रोजगार

Published On: Mar 18 2018 1:51AM | Last Updated: Mar 18 2018 1:51AMहिंगोली : गजानन लोंढे

जिल्ह्यातील दर्जेदार तेंदुची परराज्यात मागणी असल्याने वनविभागाला तेंदू संकलनामधून दरवर्षी कोट्यवधीचा महसूल प्राप्‍त होत असतो. जिल्ह्यात असलेल्या अकरा तेंदू घटकातून मागील वर्षी तब्बल 44 लाख 49 हजार पुड्यांचे संकलन करण्यात आले असून, तेंदू संकलनातून जिल्ह्यातील 2809 कुटुंबांना रोजगार मिळाला असून, मजुरी व्यतिरिक्‍त मजुरांना तब्बल 1 कोटी 93 लाख 87 हजार 329 रुपयांचे बोनस वाटप करण्यात येणार आहे. 

हिंगोली जिल्ह्यात तेंदुचे अकरा घटक आहेत. यामध्ये रामेश्‍वर, कळमनुरी, खडकद, पेडगाव, हिंगोली, आजेगाव, जांभरून, साखरा, नागेशवाडी, वसमत, औंढा नागनाथ या घटकांचा समावेश आहे. जिल्ह्यातील तेंदू पत्ता दर्जेदार असल्याने विडी व्यावसायिकाकडून तेंदुला मोठी मागणी असते. हिंगोलीचा तेंदू पत्ता आंध्र प्रदेशासह छत्तीसगडमधील व्यापारी विकत घेतात. मागील वर्षी अकरा घटकांमधून 44 लाख 49 हजार 130 पुड्यांचे संकलन झाले होते. यासाठी 2809 कुटुंबांनी मजुरी केली होती. 

तेंदू संकलनातून जिल्ह्यातील सुमारे 2800 कुुटुंबांना रोजगार मिळाला होता. वनविभागाच्या वतीने तेंदू मजुरांना मजुरी व्यतिरिक्‍त प्रोत्साहनपर भत्‍ता वाटप करण्यात येतो. 2017 या वर्षात तेंदू मजुरांना 1 कोटी 93 लाखांचा प्रोत्साहनपर मजुरी मंजूर झाली आहे. वन विभागाकडे ही रक्‍कम प्राप्‍त झाली असून ती लवकरच मजुरांच्या खात्यावर वर्ग केली जाणार आहे.

URL : Tentu collection, received, employment, eight eighty thousand, families