Thu, Jul 18, 2019 08:05होमपेज › Marathwada › बससाठी तहसीलदारांच्या दालनात शाळा

बससाठी तहसीलदारांच्या दालनात शाळा

Published On: Jul 13 2018 12:49AM | Last Updated: Jul 12 2018 10:36PMगंगाखेड : प्रतिनिधी

खळी, मैराळसागंवी, गौंडगाव, चिंचटाकळी येथील रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे या मार्गावरील बससेवा बंद झाली. बस सुरू करण्याच्या मागणीसाठी ग्रामस्थांसह विद्यार्थ्यांनी तहसीलदारांच्या दालनात दि.12 जुलै रोजी शाळा भरवली.

तालुक्यातील गोदावरी पात्रातील बेकायदा वाळू उपसा महसूल प्रशासनाच्या आशीर्वादाने  पावसाळ्यात सुरू आहे. यात रस्त्याची चाळणी होऊन खड्डे पडले आहेत. गोदाकाठी असल्याने खळी, चिंचटाकळी, गौंडगाव, मैराळसावंगी रस्त्यावर बेकायदा वाळू वाहतुकीमुळे   रस्ता राहिला नसल्याने या मार्गावरील बससेवा दोन दिवसांपासून बंद झाली  आहे. ग्रामस्थांनी बसस्थानकात धाव घेऊन बससेवा बंद होण्याची कारणे विचारली. यावेळी रस्त्यावरील खड्ड्यामुळे बससेवा बंद केल्याचे सांगितले. या मार्गावरील रस्ता दुरूस्तीसाठी काही दिवसांपूर्वी रस्ता रोको करण्यात आला. सार्वजनिक बांधकाम विभागाने दुरूस्तीचे लेखी आश्वासन दिले पण दुरूस्ती झाली नसल्याने बससेवा बंद राहिली. विद्यार्थ्यांची शाळा बंद झाल्याने ग्रामस्थांसह विद्यार्थ्यांनी  तहसीलदारांच्या दालनात शाळा भरवली. यावेळी रमेश पवार, तुकाराम सुरवशे, परमेश्वर पवार, सुरेश ईखे, शिवाजी जाधव, ओंकार पवार, गजानन गिरी, गणेश बारगिरे यांच्यासह पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.