Tue, Jun 25, 2019 21:33होमपेज › Marathwada › तलवारीच्या  वाराने  हाताची बोटे तोडली

तलवारीच्या  वाराने  हाताची बोटे तोडली

Published On: Mar 04 2018 1:41AM | Last Updated: Mar 04 2018 12:06AMमाजलगाव : प्रतिनिधी

धूलिवंदनाच्या दिवशी झालेल्या भांडणाची फिर्याद पोलिस ठाण्यात देत असल्याच्या कारणाहून कपिल मेंढके सह अन्य एकाने दोन जणांना तलवारीने मारहाण केली. यात एकाच्या हाताची बोटे तोडली.   माजलगाव ग्रामीण पोलिस ठाण्यात पाच जणांविरोधात गंभीर गुन्ह्यासह आर्मअ‍ॅक्टचा गुन्हा दाखल करण्यात आला.

 धूलिवंदानाचा उत्सव साजरा होत असताना माजलगाव तालुक्यातील किट्टीआडगाव येथील सय्यद आकबर शेख मुजीब शेख मुस्तफा यांना माजलगाव येथील कपिल मेंढके, रवी गायकवाड, अमोल शिंदे यांनी मारहाण केली होती. या मारहाणीची फिर्यादी देण्यासाठी जात असताना माजलगाव कॅनॉलजवळील फुले पिंपळगाव परिसरात  शेख मुसीर शेख मुस्तफा यास व साक्षीदारास कपिल मेंडके, रवी गायकवाड व अमोल शिंदे यांनी तलवारीने मारहाण करून गंभीर जखमी केले.  शेख मुजीब शेख मुस्तफा याच्या डाव्या हाताचे दोन बोटे तुटले आहेत. सय्यद अकबर सय्यद बाबा याला गंभीर मार लागला आहे. यातील जखमी बीड व औरंगाबाद येथील रुग्णालयात उपचार घेत आहेत. या प्रकरणी माजलगाव ग्रामीण पोलिस ठाण्यात शेख मुसीर शेख मुस्तफा (रा.किट्टिआडगाव) यांच्या फिर्यादीवरून आरोपी कपिल मेंढके, रवी गायकवाड व अशोक शिंदे सह अन्य अनोळखी दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील रवी गायकवाड हा आरोपी अटक आसून या गुन्ह्याचा तपास पोलिस उपनिरीक्षक एम.जी. नरके, उपनिरीक्षक बी. डी. मांडवे हे करीत आहेत.