Tue, Jul 16, 2019 09:59होमपेज › Marathwada › आमदार धसांची लकब पुन्हा दिसली.....

आमदार धसांची लकब पुन्हा दिसली.....

Published On: Jul 14 2018 12:55AM | Last Updated: Jul 13 2018 11:16PMआष्टी ः प्रतिनिधी 

नागपूर येथे सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनात आ. सुरेश धस यांनी शेतकर्‍यांविषयीचे प्रश्‍न प्रखरतेने मांडले. त्यांचा हा रुबाब, जोश आणि बोलण्याची स्टाईल पाहून त्यांचा 1999 चा काळ ज्येष्ठ कार्यकर्त्यांना आठवला. विधान परिषद निवडणुकीत विजयी झाल्यानंतर आ. धसांचे हे पहिलेच अधिवेशन होते.

बीड जिल्ह्याच्या राजकारणात किंगमेकर ठरत असलेल्या सुरेश धस यांचा गेल्या चार वर्षांचा आलेख  अडचणींचा होता. वेळोवेळी आलेले अपयश पचवत त्यांनी नुकत्याच झालेल्या विधान परिषदेच्या माध्यमातून आमदारकी मिळवून पुन्हा भरारी घेतली. महाविद्यालयीन जीवनात विद्यार्थी संसदेचे सचिव, जामगावचे सरपंच, आष्टा (ह.ना.) जि.प.गटाचे सदस्य,  बीड जि.प.चे उपाध्यक्ष होण्याचा मान धस यांनी कुठलाही राजकीय वरदहस्त नसताना मिळवला. सन 1999 साली आष्टी विधानसभेची जागा शिवसेनेकडे असताना अचानक ही जागा  गोपीनाथ मुंडे यांनी बदलून घेत भाजपला मिळवली. त्याच वेळी सुरेश धस यांना त्या विधानसभेच्या उमेदवारीनंतरच धस यांच्या राजकीय जीवनाला एक वेगळीच दिशा मिळाली. 

सुरेश धस यांचा मोठा मित्र परिवार, मतदारसंघातील जनसंपर्क यामुळे 1999 साली ते आमदार झाले. त्यावेळी  सुरेश धस अहारोत्र काम करत होते. आपल्या मतदार संघासाठी निधी खेचून आणण्यात धावपळ करत होते. वेळप्रसंगी सभागृहात  विरोधकांना जशासतसे प्रतिउत्तर देत होते. ती स्टाईल पुन्हा एकदा 18 वर्षानंतर सुरेश धस यांच्यामध्ये नागपूर येथील पावसाळी अधिवेशनात गुरुवारी पुन्हा दिसून आली. लातूर-बीड-उस्मानाबाद स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत सुरेश धस यांना भाजपकडून उमेदवारी देण्याचा आग्रह पंकजा मुंडे यांनी लावून धरत उमेदवारी देऊन धसांना आमदार केल्याचा फायदा भाजपला होत असल्याचे समोर येऊ लागले आहे. 

सोशल मीडियावर क्‍लिप झाल्या व्हायरल

मध्यंतरी चार वर्षांच्या काळात राज्य सरकारला विधान परिषदेत बोलताना विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे आणि विधान परिषद आ.अमरसिंह पंडित चांगलेच धारेवर धरले होते. आ.सुरेश धस यांनी गेल्या दोन दिवसांत जे प्रभावी भाषण करून सरकारची बाजू मांडल्या.  त्याच्या वेगवेगळ्या व्हिडिओ क्लिप अन् ऑडिओ क्लिप सध्या सोशल मीडियावर चांगल्याच गाजत आहेत. आपल्या अण्णाचं रांगड भाषण पाहून कार्यकर्त्यांमध्ये उत्साह वाढत असल्याचे दिसून येत आहे.