Thu, Jun 27, 2019 03:35होमपेज › Marathwada › हल्लाबोल यात्रा म्हणजे तमाशा

हल्लाबोल यात्रा म्हणजे तमाशा

Published On: Jun 25 2018 1:48AM | Last Updated: Jun 24 2018 10:49PMपाटोदा : प्रतिनिधी

राष्ट्रवादीने काही नेतृत्व हे निलगिरीच्या झाडासारखी वाढवले असून त्या पक्षात चांगल्या माणसांना स्थान नाही. ज्यांना मी पक्षात आणले आज तेच माझ्या विरोधात बोलत आहेत. प्रकाश सोळंके यांना मी पक्षात आणले व पक्षाने त्यांनाच संधी दिली. राष्ट्रवादीची हल्लाबोल यात्रा म्हणजे केवळ तमाशा असून स्थानिक स्वराज्य निवडणुकीत राष्ट्रवादीची नवरी मंडप सोडून पळाली असल्याची टीका आ. सुरेश धस यांनी रविवारी केली.

उस्मानाबाद बीड लातूर स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत विजय मिळविल्यानंतर आ. सुरेश धस यांचा पाटोदा शहरात नागरी सत्कारा प्रसंगी ते बोलत होते. व्यासपीठावर माजी जि. प. अध्यक्ष सयद अब्दुल्ला, भाजप जि. उपाध्यक्ष मधुकर गजे, जि. प . सदस्य संजय नवले, प्रकाश कवठेकर, माउली जरांगे, प. स. सभापती बबन सोनबणे, नगराध्यक्ष नारायणकर, सोमीनाथ कोल्हे,  सयद शहानवाज, नयुम पठाण, सभापती श्रीहरी गिते, संदीप जाधव, अ‍ॅड. जब्बार पठाण, पांडुरंग नागरगोजे, संजय सानप आदी उपस्थित होते. पुढे आ. धस म्हणाले की, मी लढवलेली निवडणूक ही इतर निवडणुकांपेक्षा अत्यंत वेगळी होती. समोर धनाने बलाढ्य असलेला उमेदवार  असतानाही पंकजा मुंडे यांचा विश्वास व त्यांनी दिलेला भक्कम पाठिंबा यामुळे निवडून आलो. यावेळी उपस्थित मान्यवरांची भाषणे झाली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सोमीनाथ कोल्हे, सूत्रसंचालन ज्ञानदेव काशीद तर आभार बळीराम पोटे यांनी मानले.