Sat, Feb 16, 2019 08:43होमपेज › Marathwada › 1 लाख 14 हजार 978 क्‍विंटल बियाणांचा पुरवठा 

1 लाख 14 हजार 978 क्‍विंटल बियाणांचा पुरवठा 

Published On: Jun 21 2018 1:24AM | Last Updated: Jun 20 2018 10:17PMपरभणी : प्रतिनिधी

राज्य बियाणे महामंडळाच्या (महाबीज) परभणी विभागांतर्गत परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, उस्मानाबाद, सोलापूर या सहा जिल्ह्यांसाठी यावर्षी 1 लाख 14 हजार 978 क्‍विंटल बियाणे पुरवठा करण्यात आला आहे. हे बियाणे राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियानांतर्गत कडधान्य  पिकांचे बियाणे शेतकर्‍यांना अनुदानावर देण्यात आले आहे. खरिपासाठी महाबीजने परभणी विभागांतर्गतच्या सहा जिल्ह्यांमध्ये सोयाबीन बियाणांचा 1 लाख 4 हजार 258 क्‍विंटल पुरवठा केला आहे. त्यात परभणी जिल्ह्यासाठी 11 हजार 92 क्‍विंटल, हिंगोलीकरिता 4 हजार 729 क्‍विंटल, नांदेड 22 हजार 553, लातूर 42 हजार 377, उस्मानाबाद 20 हजार 24, सोलापूर 3 हजार 484 क्‍विंटल बियाणे पुरवठा करण्यात आला आहे, तर इतर पिकांचे 10 हजार 720 क्‍विंटल बियाणे उपलब्ध करून देण्यात आले आहे.

राष्ट्रीय अन्‍न सुरक्षा अभियान (कडधान्य) अंतर्गत मूग, उडीद, तूर पिकांच्या प्रात्यक्षिक वितरणासाठी 10 वर्षांच्या आतील वाणास प्रतिकिलो 50 रुपये, तसेच 10 वर्षांच्या वरील वाणास प्रतिकिलो 25 रुपये अनुदान जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे अनुदान वजा करता 10 वर्षांखालील मुगाच्या वाणांच्या बियाण्यांची किंमत प्रतिकिलो 60 रुपये, उडिदाचे 53 रुपये, तुरीचे 57 रुपये तर 10 वर्षांखालील मुगाच्या वाणांचे बियाणे 85 रुपये, उडदाचे 95 रुपये, तुरीचे 68.50 रुपये प्रतिकिलो अशी किंमत निश्‍चित करण्यात आली आहे. राष्ट्रीय तेलताड योजनेअंतर्गत सोयाबीनच्या 15 वर्षांआतील वाणास प्रतिकिलो 34 रुपये अनुदान जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे अनुदान कमी करून 34 रुपये प्रतिकिलो किंमत निश्‍चित केली आहे.