Sat, Nov 17, 2018 01:33



होमपेज › Marathwada › एक लाख रूपयांची लाच घेताना पुरवठा अधिकारी ताब्‍यात 

एक लाख रूपयांची लाच घेताना पुरवठा अधिकारी ताब्‍यात 

Published On: Mar 22 2018 4:49PM | Last Updated: Mar 22 2018 4:49PM



बीड :  प्रतिनिधी
पुरवठा अधिकाऱ्याला एक लाख १५ हजार रूपयांची लाच घेताना रंगेहात ताब्‍यात घेण्यात आले आहे. डॉ. एन. आर. शेळके आणि कारकून फड यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने गुरुवारी सकाळी रंगेहाथ पकडले. 

आर. एन. शेळके यांनी बुधवारी राष्ट्रवादीचे आमदार अमरसिंह पंडित यांच्या विरोधात जातीवाचक शिवीगाळ केल्याची व खंडणी मागितल्याची तक्रार शिवाजीनगर पोलिस ठाण्यात दिली होती. शेळके आणि पंडित यांच्यातील वाद विकोपाला गेला असतानाच स्वस्त धान्य दुकानदार संघटनेचे उपाध्यक्ष काटे यांच्याकडून एक लाख १५ हजार रुपयांची लाच घेताना शेळके यांना पकडल्याने एकच खळबळ उडाली आहे.

Tags : beed district, Supply Officer, bribe