Thu, Apr 25, 2019 04:14होमपेज › Marathwada › अधीक्षक अभियंत्याविरोधात एल्गार

अधीक्षक अभियंत्याविरोधात एल्गार

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

परभणी : प्रतिनिधी

महावितरणच्या अधीक्षक अभियंत्यांकडून होत असलेला अन्याय दूर करून दडपशाहीच्या कारवाया रद्द कराव्यात, अन्यथा सोमवारी (दि.26) सायंकाळी साडेपाच वाजेनंतर अन्नत्याग करून सलग 72 तास कार्यालयात सेवेत राहून आत्मक्लेष आंदोलन करण्याचा इशारा सबऑर्डिनेट इंजिनिअर्स असोशिएशन (एसईए)ने दिला आहे. याबाबत नांदेड परिमंडळातील मुख्य अभियंता यांना निवेदन देण्यात आले आहे. 

महावितरणचे शहर व इतर उपविभागातील अभियंंते हे रविवारी व सार्वजनिक सुटीही न घेता दररोज 14 तास कामे करतात. त्यांना अधीक्षक अभियंता हे तुमचे कामकाज बरोबर नाही  असे सांगून निलंबनासाठी कारणे दाखवा नोटीस देतात. याविरोधात संघटनेच्या माध्यमातून आवाज उठवण्यात आला आहे. महावितरणच्या परभणी मंडळांतर्गत माहे मार्च महिन्यात विक्रमी थकबाकी वसुलीसाठी सर्व अभियंते व कर्मचार्‍यांनी कसोशीने प्रयत्न केले.19 मार्च रोजी काही अभियंत्यांना थकबाकीवरून अधीक्षक अभियंता यशवंत कांबळे यांनी कारणे दाखवा नोटीस दिल्या. वरिष्ठांना ते वास्तव माहिती न देता दिशाभूल करतात. मंडळ प्रमुख या नात्याने अभियंते व कर्मचार्‍यांचे त्यांनी मनोबल वाढवणे अपेक्षित आहे. जाणूनबुजून ठराविक अभियंत्यांना दोषी दाखवण्याचा नेहमी प्रयत्न होत असल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे. 

या शिस्तभंग कारवाया महावितरणची कामगिरी सुधारण्यापेक्षा त्यांचे वैयक्तीक हित साधण्यासाठी करत आहेत, असा आरोपही करण्यात आला आहे. उपविभागांतर्गत अकृषिक थकबाकी वसुलीत एका वर्षात 20 टक्क्याने घट झाली. मार्च 2017 ला ही थकबाकी 38.73 कोटींची होती. मोहीम राबवत आता ही फेबु्रवारी 2018 पर्यंत केवळ 31.49 कोटींची राहिली. यात 20 टक्क्याने घट करीत वसुलीसाठी प्रयत्न झाला. तरीही अभियंत्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आल्या.


  •