Thu, Aug 22, 2019 10:30होमपेज › Marathwada › बलात्काराच्या आरोपीची कारागृहात आत्महत्या

बलात्काराच्या आरोपीची कारागृहात आत्महत्या

Published On: Sep 05 2018 8:59PM | Last Updated: Sep 05 2018 8:59PMउस्मानाबाद : प्रतिनिधी

बलात्काराच्या आरोपाखाली न्यायालयीन कोठडीत असलेल्या आरोपीने गळफास घेऊन आत्महत्या केली. जिल्हा कारागृहात बुधवारी (दि. 5) सकाळी हा प्रकार उघडकीस आला. 

पोलिसांनी सांगितले, की योगेश शिवाजी शिंपले (रा. कळंब) असे या आरोपीचे नाव आहे. त्याच्यावर बलात्कारचा गुन्हा नोंद झाला असून, सध्या तो न्यायालयीन कोठडीत आहे. बुधवारी सकाळी बरॅकीत कोणीही नसताना टी शर्टने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे उघडकीस आले. या प्रकारानंतर कारागृहात एकच खळबळ उडाली. तातडीने ही माहिती वरिष्ठांना तसेच पोलिसांना कळविण्यात आली. पोलिसांनीही घटनास्थळाचा पंचनामा केला. पुढील सोपस्कार सायंकाळी उशिरापर्यंत सुरु होते.

दरम्यान, योगेश हा न्यायालयीन कोठडीत असताना ही दुर्घटना घडली असल्याने आता प्रचलित नियमांनुसार तपास व पुढील कारवाई होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. आनंदनगर पोलिस ठाण्याचे अधिकारी, कर्मचार्‍यांनी पंचनामा केला.