Thu, Jun 20, 2019 20:50होमपेज › Marathwada › वीजबिल दुरुस्तीसाठी आत्महत्येचा इशारा

वीजबिल दुरुस्तीसाठी आत्महत्येचा इशारा

Published On: May 25 2018 1:10AM | Last Updated: May 24 2018 10:46PMसोनपेठ : प्रतिनिधी

मागील सहा वषार्र्ंपासून वीजबिल दुरुस्तीसाठी सतत कार्यालयास अर्ज दाखल करणार्‍या ग्राहकाने वीजमंडळाच्या कारभारास कंटाळून वीज वितरण कंपनीस एका निवेदनाद्वारे आत्महत्येचा इशारा दिला आहे.

सोनपेठ येथील संभाजीनगर परिसरातील पिठाची गिरणी चालवणार्‍या भीमराव महामुनी यांनी वीजबिल दुरुस्तीसाठी आत्महत्येचा इशारा दिला आहे. भीमराव यांना 2012 साली जून महिन्यात 14 हजार 790 रुपयांचे बिल आले. हे बिल दुरुस्त करण्यासाठी त्यांनी 24  जुलै 2012 साली वीज वितरण कंपनीकडे अर्ज दिला. या अर्जाची कुठलीही दखल न घेता वीज कंपनीने त्यांचे मीटर बंद केले. वारंवार विनंती अर्ज केल्यानंतर 10 हजार रुपये भरून त्यांचे मीटर चालू करून दिले. यानंतरही त्यांना वीजबिल दुरुस्त करून न देता दरमहा सरासरी 5 हजार रुपये बिल आकारल्या जाते.

गेली सहा वर्षे महामुनी सरासरी बिल भरत आहेत. हे बिल दुरुस्त करून देण्यासाठी त्यांनी वीज वितरण कंपनीच्या मुख्य अभियंत्यापासून मुख्यमंत्र्यांपर्यंत विनंती अर्ज केले, पण वीजबिल दुरुस्तीकडे कंपनीचे कर्मचारी पूर्ण बिल भरा अन्यथा विद्युत पुरवठा खंडित करण्याच्या धमक्या देत आहेत. यामुुळेे महामुनी यांनी जिल्हाधिकारी, तहसीलदार सोनपेठ, पोलिस स्टेशन सोनपेठ यांच्यासह वीज वितरण कंपनीच्या उप अभियंत्यास टपालाने चुकीच्या वाढत्या जास्त बिलाच्या दबावामुळे आत्महत्या करण्याशिवाय पर्याय नसल्याचे नमूद केले आहे.