Mon, Sep 24, 2018 02:14होमपेज › Marathwada › मराठा आरक्षणासाठी तरूणाची आत्महत्या

मराठा आरक्षणासाठी तरूणाची आत्महत्या

Published On: Aug 29 2018 1:42AM | Last Updated: Aug 28 2018 11:14PMमानवत  : प्रतिनिधी

तालुक्यातील रामपुरी बु. येथे दीपक नागोराव यादव या 24 वर्षीय तरूणाने 24 ऑगस्ट रोजी शेतात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. सदरील तरूणाने मराठा आरक्षणासाठीच आत्महत्या केली असून त्यांच्या कुटूंबियाला शासकीय मदत द्यावी या मागणीचे निवेदन सकल मराठा समाजाच्या वतीने तहसीलदारांना सोमवारी देण्यात आले.

दीपक यादव या तरूणाने मराठा आरक्षणासाठी झालेल्या आंदोलनात सहभाग नोंदवला होता. परंतु वेळोवेळी आंदोलने करूनही सरकारने केलेल्या दुर्लक्षामुळे त्यांना मानसिक धक्का बसला होता. सततच्या विचाराने ग्रासून सदरील तरूणाने आत्महत्या केल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे. 

घरातील कर्ता पुरूष गेल्याने निराधार झालेल्या कुटुंबाला शासकीय मदत जाहीर करावी व शासनाने मराठा समाजाला त्वरित आरक्षण द्यावे अशी मागणी सकल मराठा समाजाच्या वतीने निवेदनात करण्यात आली आहे.