Wed, Apr 24, 2019 19:31होमपेज › Marathwada › मराठा आरक्षणासाठी हिंगोलीत एकाचा आत्महत्येचा प्रयत्न 

मराठा आरक्षणासाठी हिंगोलीत एकाचा आत्महत्येचा प्रयत्न 

Published On: Jul 29 2018 9:46PM | Last Updated: Jul 29 2018 9:46PMहिंगोली : प्रतिनिधी 

मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी राज्यभरात विविध पद्धतीने आंदोलन सुरू आहे. त्यातच आज सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास येथील गांधी चौकातील एका इमारतीवर चढून एकाने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. दिलीप पवार असं या व्यक्तीचे नाव असून त्याना पोलिसांनी त्‍याला ताब्यात घेतले आहे. 

गेल्या आठ दिवसांपासून जिल्हाभरात मराठा आरक्षणाचा प्रश्न तीव्र झाला आहे. ग्रामीण भागात अनेक ठिकाणी रास्ता रोको, ठिय्या आंदोलन केली जात आहेत. मराठा आरक्षणासाठी आत्महत्या करणाऱ्यांची उदाहरणे ताजी असताना हिंगोलीतही आरक्षणासाठी आत्महत्येचा प्रयत्न करण्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. हिंगोली तालुक्यातील खांबाळा येथील रहिवाशी असलेले दिलीप पवार  सायंकाळी सातच्या सुमारास येथील गांधी चौकातून जवळच असलेल्या एका उंच इमारतीवर चढले होते. मराठा समाजाला आरक्षण द्या अशी मागणी करत घोषणाबाजी केली, अशी माहिती त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या प्रत्यक्षदर्शींनी दिली. ही बाब रस्त्यावरून ये-जा करत असणाऱ्या बघ्यांच्या लक्षात आल्याने त्यांनी तात्काळ खाली उतरविण्याची विनंती केली. घटनास्थळी पोलिस दाखल झाल्याने पुढील अनर्थ टळला आहे.