Fri, Mar 22, 2019 22:44होमपेज › Marathwada › आत्महत्याग्रस्त कुटुंबीयांचा अहवाल सादर करा 

आत्महत्याग्रस्त कुटुंबीयांचा अहवाल सादर करा 

Published On: Apr 26 2018 2:02AM | Last Updated: Apr 25 2018 10:32PMबीड : प्रतिनिधी

शेतकरी आत्महत्या बाबत अपर जिल्हाधिकारी बी. एम. कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात शेतकरी आत्महत्या बाबत जिल्हास्तरीय समितीची बैठक बुधवारी पार पडली. यावेळी त्यांनी आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांच्या अपेक्षाचा आढावा घेतला. त्यांच्या मागणीनुसार त्यांच्या कुटुंबातील व्यक्तीला त्वरित लाभ मिळवून देण्यासाठी संबतिध अधिकार्‍यांनी दोन दिवसांत अहवाल सादर करण्याच्या सूचना दिल्या.

बीड जिल्ह्यातील आत्महत्याग्रस्त शेतकर्‍यांचा एकूण 14 प्रकरणांचा आढावा अपर जिल्हाधिकारी बी. एम. कांबळे यांनी घेतला. या शेतकर्‍यांच्या कुटुंबीयांना त्यांच्या उदरनिर्वाहासाठी शासनाकडून काय अपेक्षा आहेत असे त्यांनी बैठकीत विचारले. यावेळी 14 प्रकरणातील आत्महत्याग्रस्त प्रत्येक कुटुंबीयातील व्यक्तींनी शासनाकडून विहीर, शेळ्या, म्हशी, मुलांच्या शिक्षणाचा खर्च, मुलांच्या औषधोपचारासाठी खर्च, त्यांच्या विधवा पत्नीला संजय गांधी निराधार योजनेचा लाभ शासनाकडून मिळावा तसेच सुशिक्षीत मुलगा असेल तर त्याला शासकीय नोकरी मिळावी अशा अपेक्षा व्यक्त केल्या. 

बैठकीस निवासी उपजिल्हाधिकारी चद्रकांत सूर्यवंशी, प्रभारी जिल्हा पोलिस अधिक्षक अजित बोराडे, अतिरिक्त उपमुख्य कार्यकारी अधिकारी धनराज निला, उपजिल्हाधिकारी रोहयो महेंद्र कांबळे, उपविभागीय अधिकारी विकास माने, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, ग्रामसेवक, आत्महत्याग्रस्त शेतकर्‍यांचे प्रतिनिधी जीवनराव बजगुडे, संबधित अधिकारी व आत्महत्याग्रस्त शेतकर्‍यांचे विविध तालुक्याच्या गावातील कुंटुंबीय उपस्थित होते. 

Tags : Marathwada, Submit, report,  suicide, victims