Sat, Nov 17, 2018 06:00होमपेज › Marathwada › ‘शुभ कल्याण’च्या संचालक मंडळाची प्रॉपर्टी होणार जप्‍त

‘शुभ कल्याण’च्या संचालक मंडळाची प्रॉपर्टी होणार जप्‍त

Published On: Jul 14 2018 12:55AM | Last Updated: Jul 13 2018 11:20PMबीड : प्रतिनिधी

उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंब येथील शुक कल्याण मल्टिस्टेट को-ऑपरेटिव्ह के्रडीट सोसायटीच्या अध्यक्षांनी  ठेविदारांना ठेवीवर 17 ते 18 टक्के व्याज परतावा देण्याचे आमिष दाखवून फसवणूक केल्याचे समोर आले आहे. सर्व शाखांमधील प्रकरणांची दखल घेत जिल्हाधिकारी एम. डी. सिंह यांनी गृह विभाग सचिवांना पत्र पाठवून शुभ कल्याणच्या संचालकांची प्रॉपर्टी जप्‍त करण्याची शिफ ारस  केली आहे.

शुभ कल्याण मल्टिस्टेट  को-ऑपरेटिव्हच्या बीड जिल्ह्यातील माजलगाव, अंबाजोगाई, परळी, नेकनूर, धारूर व केज येथे शाखा आहेत. या शाखांच्या संस्थापक व संचालकांनी ठेवीदारांना ठेवीवर 17 ते 18 टक्के व्याज परतावा देण्याचे आमिष दाखवून त्यांच्या ठेवी सोसायटीमध्ये ठेवून घेतल्या. मुदत संपूनही  ठेवी  परत दिल्या नाहीत. याअनुषंगाने गेवराईच्या उपविभागीय दंडाधिकार्‍यांनी अहवाल जिल्हाधिकार्‍यांना सादर केला होता. त्यामुळे बीड जिल्ह्याच्या मर्यादित असलेल्या संस्थापकांची प्रॉपर्टी जप्‍त करण्याची शिफ ारस  गृह विभाग सचिवांना पत्र पाठवून केली आहे.