होमपेज › Marathwada › विद्यार्थी, महिलांचा तहसील कार्यालयावर मोर्चा

विद्यार्थी, महिलांचा तहसील कार्यालयावर मोर्चा

Published On: Aug 09 2018 1:36AM | Last Updated: Aug 09 2018 12:53AMमानवत : प्रतिनिधी

मराठा आरक्षणाच्या मागणीसंदर्भात बुधवारी शालेय, महाविद्यालयीन विद्यार्थी व महिलांचा तहसील कार्यालयावर ठोक मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात शहरासह ग्रामीण भागातील विद्यार्थी, विद्यार्थिनी, महिला व समाजाचा सहभाग मोठा होता.

न. प. कार्यालयापासून शहराच्या मुख्य रस्त्याने तहसील कार्यालयापर्यंत घोषणा देत हा मोर्चा काढण्यात आला. तहसील कार्यालयावर मोर्चा आल्यानंतर त्याचे सभेत रूपांतर झाले. तेथे ऋतुजा मगर, दीपा माने, इंदुमती तारे, अजिंक्य उक्‍कलकर, वैष्णवी साबळे आदींनी मनोगत व्यक्‍त केले. त्यानंतर विद्यार्थिनी व महिलांच्या हस्ते तहसीलदार नीलम बाफना यांना निवेदन देण्यात आले. या निवेदनानंतर विद्यार्थ्यांना अल्पोपहार देण्यात आला.या मोर्चात मोठ्या संख्येने विद्यार्थिनी, महिला सहभागी झाल्या होत्या.
आज पाथरी बंदचे आवाहन

पाथरी ः मराठा समाजाला तातडीने आरक्षण द्यावे, या मागणीसाठी पाथरी तालुक्यात तहसील कार्यालयासमोर सुरू असलेल्या बेमुदत धरणे आंदोलनाचा दि. 8 ऑगस्ट हा 21 वा दिवस होता. 9 ऑगस्ट रोजी सकल मराठा ठोक मोर्चातील आंदोलकांनी महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. पाथरी तालुक्यातील मराठा समाज बांधवांकडून दि. 9 ऑगस्ट रोजी शहरासह तालुक्यात सर्वत्र बंद पाळण्यात येणार आहे. या बंददरम्यान पोखर्णी फाटा येथे सकाळी रास्ता रोको करण्यात येणार आहे. याशिवाय तालुक्यात अनेक ठिकाणी गुरुवारी बंद पाळण्यात येणार आहे.