Wed, Jan 23, 2019 01:17होमपेज › Marathwada › नांदेडमध्ये सीआरपीएफच्या लाठीहल्‍ल्यात विद्यार्थ्याचा मृत्यू

नांदेडमध्ये सीआरपीएफच्या लाठीहल्‍ल्यात विद्यार्थ्याचा मृत्यू

Published On: Jan 03 2018 5:06PM | Last Updated: Jan 03 2018 5:26PM

बुकमार्क करा
नांदेड : प्रतिनिधी

भीमा कोरेगाव येथील दंगलीच्या निषेर्धात नांदेड जिल्ह्यात बंदला हिंसक वळण लागले. हदगाव तालुक्यातील आष्टी येथे बंद दरम्यान पोलिसांच्या लाठीहल्यात एका शाळकरी विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली. या घटनेनंतर तालुक्यात वातावरण अधिकच चिघळले.

मिळालेल्या माहितीनुसार, हदगाव तालुक्यातील आष्टी येथील जिल्हा परिषद शाळेत दहावीच्या वर्गात शिकणारा योगेश प्रल्हाद जाधव (वय.१५), हा शाळेत नेहमीप्रमाणे गेला होता. मात्र, वातावरण गंभीर असल्याने शाळा सोडून देण्यात आली. घराकडे दप्तर घेऊन निघाला असता, पाठीमागून सीआरपीएफची एक तुकडी आली. 

तुकडीमधील पोलिस कर्मचार्‍यांना सदरील बालक हा आंदोलनात सहभागी असल्याचे वाटले, यावरून पोलिसांनी त्यास मारहाण करण्यास सुरुवात केली. मानेवर जोराची काठी बसताच जाग्यावर तो कोसळला. मार जोराचा बसल्याने नाकातोंडातून रक्‍त निघू लागले. तेथील काहींनी योगेश जाधव यास तात्काळ हदगाव येथील उपजिल्हा रुग्णालयात आणले. मात्र, वैद्यकीय अधिकार्‍यांनी त्याला मृत घोषित केले.

पोलिसांच्या लाठीहल्‍ल्यात एका शाळकरी विद्यार्थ्यास प्राणास मुकावे लागले. या घटनेची माहिती कळताच रुग्णालयात मोठा जमाव एकत्र आला. जोपर्यंत दोषी पोलिसांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होत नाही. तोपर्यंत प्रेत ताब्यात घेणार नसल्याचा पवित्रा नातेवाईक व कार्यकर्त्यांनी घेतला. या प्रकरणी उशिरापर्यंत पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला नव्हता.

महाराष्ट्र बंद मागे; भिडे, एकबोटेंना अटक करा : प्रकाश आंबेडकर 

'याकूब मेमनप्रमाणेच भिडे, एकबोटेंवर गुन्हा दाखल करा'

भीमा-कोरेगाव प्रकरण : मुंबईत तणाव, गाड्यांची तोडफोड