Tue, Apr 23, 2019 23:34होमपेज › Marathwada › मराठा आरक्षणासाठी रास्ता रोको

मराठा आरक्षणासाठी रास्ता रोको

Published On: Jul 26 2018 1:34AM | Last Updated: Jul 26 2018 12:49AMताडकळस : प्रतिनिधी

मराठा समजाला आरक्षण देण्यात यावे, मुख्यमंत्र्यांवर गुन्हा दाखल करण्यात यावा, यांसह इतर मागण्यांसाठी पूर्णा-सिंगणापूर राज्य रस्ता व ताडकळस-पालम राज्य रस्त्यावर येथील चौकात दि. 25 जुलै रोजी सकल मराठा समाजाच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. 

या आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी शहरातील व्यापार्‍यांनी आपली दुकाने बंद ठेवून कडकडीत बंद पाळला. विविध मागण्यांसाठी बुधवारी सकाळपासूनच युवक रस्त्यावर उतरले होते. बस स्थानकासमोर टायर जाळून रोष व्यक्‍त करण्यात आला. आंदोलकांचा जमाव रस्त्यावर आल्यामुळे पोलिसांची दमछाक झाली. त्यामुळे अतिरिक्‍त राज्य पोलिस बलाची एक तुकडी मागवण्यात आली होती. यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून प्रभारी पोलिस निरीक्षक सुनील पुंगळे यांनी चोख पोलिस बंदोबस्त ठेवला होता. 
पाथरीत सात दिवसांपासून धरणे आंदोलन सुरूच

पाथरी : मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावे, या मागणीसाठी पाथरी तहसीलसमोर सुरू असलेल्या बेमुदत धरणे आंदोलनाचा दि. 25 जुलै रोजी सातवा दिवस होता. या आंदोलनाला सर्वच स्तरांतून दररोज पाठिंबा वाढत असल्याने मराठा आरक्षणासाठीचा लढा व्यापक स्वरूप धारण करत असल्याचे दिसून येत आहे. पाथरी तहसीलसमोर बेमुदत धरणे आंदोलनाला दररोज विविध पक्ष, संघटना आणि समाजाचा पाठिंबा मिळत आहे. शहर व तालुक्यातील मुस्लिम बांधवांनी पाठिंबा जाहीर करून आंदोलनाला भक्‍कम साथ दिली आहे. तसेच दि. 25 जुलै रोजी भारतीय युवा मोर्चा या राष्ट्रीय  संघटनेचे मराठा आरक्षणासाठी जाहीर पाठिंबा दिला असून सर्व संबंधितांना निवेदनही देण्यात आले आहेत. भारतीय युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष सागर कदम यांनी संघटनेच्या वतीने निवेदन दिले आहे.