Thu, Jul 18, 2019 00:22होमपेज › Marathwada › केज उपजिल्हा रुग्णालयासमोर रास्ता रोको 

केज उपजिल्हा रुग्णालयासमोर रास्ता रोको 

Published On: Apr 17 2018 1:52AM | Last Updated: Apr 16 2018 10:53PMबीड : प्रतिनिधी 

केजच्या उपजिल्हा रुग्णालयात औषधींचा तुटवडा आहे. अनेकदा तक्रारी देऊनही आरोग्य विभागाकडून दखल घेतली जात नसल्याने संतप्त रुग्णांच्या नातेवाइकांनी सोमवारी प्राचार्य हनुमंत भोसले यांच्या नेतृत्वाखाली रुग्णालयासमोरच ठिय्या मांडत रास्ता रोको आंदोलन केले. या आंदोलनामुळे दीड तास वाहतूक विस्कळीत झाली होती. 

केजच्या उपजिल्हा रुग्णालयामध्ये औषधीचा तुटवडा असल्याने किरकोळ आजाराची गोळी देखील खासगी मेडिकलमधून घेण्याची वेळ रुग्णांवर आली आहे. बहुतांशवेळा रुग्णांना अंबाजोगाईत पाठविण्यात येत असल्याचे आंदोलनकर्त्यांच म्हणणे आहे. रुग्णालयात औषधीचा पुरेसा साठा उपलब्ध करावा अशी वारंवार मागणी करूनही त्याकडे दुर्लक्ष झाल्याचा आरोप रुग्णांच्या नातेवाइकांकडून करण्यात येत आहे. त्यामुळे संतप्त रुग्णांसह त्यांच्या नातेवाइकांनी प्राचार्य हनुमंत भोसले यांच्या नेतृत्वाखाली रस्ता रोको केला. रुग्णालय प्रशासनाविरोधात यावेळी घोषणाबाजी करण्यात आली. याची माहिती शहरातील अन्य पक्ष-संघटनेच्या कार्यकर्त्यांसह सर्वसामान्यांना झाली. नागरिक देखील या आंदोलनात सहभागी झाले होते. भाजपचे रमेश आडसकर, सभापती संदीप पाटील, नासेर मुंडे, शेख महेबूब, सय्यद एकबाल यांनी रास्ता रोकोमध्ये सामील होत पाठिंबा दर्शवला. रुग्णालयाच्या अधीक्षका चौरे यांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेऊन  मागण्यांचे निवेदन स्वीकारल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.

Tags : Stop the way before the kaij subdivision hospital beed