Thu, Jun 20, 2019 14:39होमपेज › Marathwada › शेतकर्‍यांच्या मागण्यांसाठी युवक काँग्रेसचा रास्ता रोको

शेतकर्‍यांच्या मागण्यांसाठी युवक काँग्रेसचा रास्ता रोको

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

एरंडेश्‍वर : प्रतिनिधी

राज्य महामार्गावरील झिरो फाटा येथे शेतकर्‍यांच्या विविध मागण्यांसाठी शासनाचे लक्ष वेधून घेण्याकरिता युवक काँगे्रसच्या वतीने 26 मार्च रोजी सकाळी 11 वाजता रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी परभणी-वसमत रस्त्यावरील वाहतूक ठप्प झाली होती. 

याप्रसंगी युवक काँगे्रसचे जिल्हाध्यक्ष नागसेन भेरजे, प्रा. व्यंकटेश काळे यांनी मनोगत व्यक्‍त केेले. यात तूर व हरभरा शेतमालाच्या खरेदीबाबत शासनाने तत्काळ हमीभाव केंद्राची उभारणी करून पैसे द्यावेत. जिल्ह्यात रोजगार हमीची कामे व पाणीटंचाईबाबत योग्य उपाययोजना राबवाव्यात, शेतकर्‍यांची संपूर्ण कर्जमाफी जाहीर करून स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू कराव्यात, मराठा, धनगर, मुस्लिम समाजाला आरक्षण द्यावे, छत्रपती शिवाजी महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाबाबत लवकर कृतीशील पावले उचलावीत, अशा विविध मागण्या मांडण्यात आल्या.

 आंदोलनात नागसेन भेरजे, डॉ. संजय लोलगे, प्रा. व्यंकटेश काळे, किशन काळे, प्रदीप देशमुख, सचिन जवंजाळ, शेख जम्मू, रवी गायकवाड, हनुमान देशमुख, सलीम कुरेशी, प्रक्षीत सवनेकर, बबन मोरे, रामप्रसाद कदम, दिलीप खुळे, नामदेव मोरे, योगेश फड, शेख गौस, आकाश गायकवाड, सिद्धांत गायकवाड, मारुती पवार आदींचा सहभाग होता. यावेळी पोलिसांनी चोख बंदोबस्त तैनात केला होता. 

Tags : Parbhani news, Youth Congress, demands of farmers, Stop road


  •