Mon, Apr 22, 2019 03:41होमपेज › Marathwada › नसबंदीसाठी पुरुषही सरसावले

नसबंदीसाठी पुरुषही सरसावले

Published On: Apr 23 2018 1:16AM | Last Updated: Apr 22 2018 11:45PMसेलू : प्रतिनिधी

कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया म्हटले की, कुटुंबातील पुरुष महिलांना समोर करतात. स्वतः मात्र तेही शस्त्रक्रिया करण्याचे टाळतात त्यामुळे कुटुंब नियोजनासारख्या राष्ट्रीय कार्यक्रमात स्त्रियांचा सहभाग 95 % राहिलेला आहे. मात्र कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेसाठी पुरुष सरसावले आहेत असे चित्र येथे बघायला मिळत आहे.

आता पुरुष  शस्त्रक्रियेची आधुनिक पद्धत याबाबत उपजिल्हा रुग्णालयाचे  वैद्यकीय अधीक्षक डॉ.संजय हरबडे व सहकारी डॉक्टरांनी पुरुषांमध्ये जनजागृती करून त्यांचे मन परिवर्तन केल्यामुळे उपजिल्हा रुग्णालयात पाच  पुरुषांवर बिनटाक्याची  शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. कुटुंबनियोजन या राष्ट्रीय कार्यक्रमात पुरुषांचा सहभाग वाढावा या उद्देशाने सेलू उपजिल्हा रुग्णालय येथे पुरुष नसबंदी शस्त्रक्रियेबाबत जाणीवजागृती कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी वैद्यकीय अधीक्षक संजय हरबडे यांनी मार्गदर्शन करताना पुरुष नसबंदी शस्त्रक्रिया ही आधुनिक पद्धत अतिशय चांगली असून कमी त्रासाची व केवळ 10 मिनीटाची ही शस्त्रक्रिया आहे. यामध्ये कुठलाही टाका दिला जात नाही. त्यामुळे कुटुंबातील पुरुषांनी या शस्रक्रियासाठी पुढाकार घेतला पाहिजे असे आवाहन डॉ.हरबडे यांनी केले  

डॉ. हरबडे यांनी वैद्यकीय अधीक्षक पदाची सुत्रे घेतल्यापासून उपजिल्हा रुग्णालयाच्या कारभारामध्ये सुसूत्रता आणली आहे. बाह्यरूग्न विभाग त्याचबरोबर आंतररुग्ण विभाग, महिलांची प्रसूती व सिजर असे अनेक उपक्रम यशस्वीपणे राबवून राज्यपातळीवर  उपजिल्हा रुग्णायाचा एक वेगळा ठसा उमटवीला आहे .आता पुरुष नसबंदी शस्त्रक्रियेसाठी या उप जिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांच्या टिमने प्रयत्न सुरू केले असून त्याला यश म्हणुन पाच पुरूषांवर नसबंदीची यशस्वी शस्रक्रिया करण्यात आली आहे.

वैद्यकीय अधीक्षक डॉ. संजय हरबडे यांनी सांगितले की, बिनटाक्याची पुरुष नसबंदी शस्त्रक्रिया ही केवळ दहा मिनिटांत होते. शस्त्रक्रियेनंतर पुरुषांना पोहणे, व्यायाम करणे, सायकल चालविणे, वजनदार वस्तू उचलणे याचा कुठलाही त्रास होत नाही. त्याचबरोबर वैवाहिक जीवनाचा आनंद त्यांना घेता येतो. त्यामुळे पुरुष नसबंदी शस्त्रक्रियेबद्दल गैरसमज करून न घेता या शस्त्रक्रियेसाठी पुरुषांनी पुढे आले पाहिजे. 

उपजिल्हा रुग्णालयाचा पुरस्काराने सन्मान

सेलू येथील उपजिल्हा रुग्णालयाचे कामकाज हे अतिशय प्रभावीपणे असल्या कारणाने 2016-17 व 2017-18 या दोन्ही वर्षाचा जिल्हास्तरीय उत्कृष्ट असा शासनाचा आनंदीबाई जोशी हा पुरस्कार या उपजिल्हा रुग्णालयाला मिळाला आहे. शासनाच्या कायाकल्प पुरस्कारानेही  सन्मानित करण्यात आले आहे. डॉ.संजय हरबडे व त्यांच्या सर्व सहकार्‍यांचे हे यश आहे.