Sun, Jul 21, 2019 14:46
    ब्रेकिंग    होमपेज › Marathwada › बंजारा गीतांवर राज्यमंत्री खोतकरांनी धरला ताल

बंजारा गीतांवर राज्यमंत्री खोतकरांनी धरला ताल

Published On: Mar 04 2018 1:47AM | Last Updated: Mar 04 2018 1:44AMराजूर : प्रतिनिधी

राज्यमंत्री अर्जुन खोतकर जालना येथून राजूरकडे जात असताना भोकरदन तालुक्यातील वसंतनगर तांडा येथे बंजारा समाजबांधवांनी त्यांना थांबवले. या वेळी खोतकर यांनी त्यांच्यासोबत बंजारा लेंगी गीतांवर हलगीच्या तालावर नृत्य केले. 

बंजारा बांधवासाठी होळीचा महत्त्वाचा मानला जातो. या सणाची वर्षभर आतुरतेने वाट पाहिली जाते. तो सण पाहुण्यांसोबत साजरा करण्याची परंपरा बंजारा समाजबांधवांची आहे. वसंतनगर तांडा येथील बंजारा समाजबांधवांनी राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांना खास करून आमंत्रित केले होते.

त्यांनी रंगाची उधळण करीत बंजारा लेंगी गीतांवर मनसोक्‍त नृत्य केले. या वेळी पंडित भुतेकर,  कैलास पुंगळे, रतनकुमार नाईक, रावसाहेब राठोड, मधुकर राठोड, मोहन राठोड आदींची उपस्थिती होती.