Tue, Nov 20, 2018 23:24होमपेज › Marathwada › खरिपासाठी सोयाबीनला पसंती

खरिपासाठी सोयाबीनला पसंती

Published On: Jun 10 2018 1:48AM | Last Updated: Jun 10 2018 12:07AMपरभणी : प्रतिनिधी

या वर्षीच्या खरीप हंगामात गतवर्षात कापसावर बोंडअळीचा प्रादुर्भाव जास्त झाल्याने जिल्हाभरातील शेतकर्‍यांनी सोयाबीन या नगदी पिकाला सर्वाधिक पसंती दिली आहे. या पिकाचे आतापर्यंत 7 हजार क्विंटल बियाणांची विक्री झाली आहे. तसेच अनेक शेतकरी घरगुती बियाणांचा वापर करत असल्याचे दिसत आहे. कापसाचे केवळ सव्वालाख पाकिटे शेतकर्‍यांनी खरेदी केली असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे कृषी सभापती श्रीनिवास मुंडे यांनी दिली आहे.  

जूनच्या पहिल्या आठवड्यातच पावसाने दमदार हजेरी लावल्यामुळे शेतकरी पेरणीला लागला. गतवर्षी बोंडअळीने कापसाचे मोठे नुकसान झाले. यामुळे शेतकर्‍यांकडून आता सोयाबीन पिकाला जास्तीची मागणी आहे. सधन शेतकरी मात्र थोड्याफार प्रमाणात कापसाची लागवड करत आहेत. यावर्षी 14 हजार 415 मेट्रिक टन खत मिळाले आहे. 

गतवर्षीचा मार्च अखेरपर्यंत जिल्ह्यात 25 हजार 179 मेट्रिक टन खतसाठा शिल्लक असून असा एकूण 49 हजार 594 मे.टन उपलब्ध आहे. त्यातील 19 हजार 700 मे. टन खताची विक्री झाली आहे. याबरोबरच 29 हजार 894 मे.टन खत शिल्लक आहे.