Sat, Dec 15, 2018 19:03होमपेज › Marathwada › दिनविशेष रांगोळीतून सामाजिक संदेश 

दिनविशेष रांगोळीतून सामाजिक संदेश 

Published On: May 01 2018 1:17AM | Last Updated: May 01 2018 12:19AMपरभणी : नरहरी चौधरी

छंद म्हणून जोपासलेल्या रांगोळी कलाप्रकारातही वेगळे वैशिष्ट्य जपत परभणी शहरातील 11 वर्षीय प्रतीक्षा रवींद्र देशमुख  ही विद्यार्थिनी  घरासमोर दिनविशेषनुसार रांगोळी काढून नागरिकांना विविध प्रकारचे सामाजिक संदेश देत आहे. एक वर्षापासून तिचा हा उपक्रम सुरू आहे.

प्रत्येक माणसाकडे काहीना काहीतरी कला असते. ती कला जोपासत असताना, त्या कलेशी एकरूप होऊन जाताना ती कला जीवनाचा एक अविभाज्य घटक बनून जाते. कलेचे रूपांतर छंदात होते अन् छंदाचे रूपांतर वेडात होते. हे वेडच आपल्यातल्या कलेच्या जाणीवा जागृत करून आपल्याकडून अधिकाधिक चांगले करवून घेते. बालविद्या मंदिर शाळेत इयत्ता 5 वी कक्षात शिक्षण घेणारी प्रतीक्षा रवींद्र देशमुख (11) हिने शाळेत चित्र काढताना वेगळा प्रयोग केला. तिच्या रांगोळीची आवड आणि छंद पाहून आई व वडील यांनी अंगणात कलेसाठी जागा उपलब्ध करून दिली. दररोज पहाटे 5 ते 6 या वेळेत ती रांगोळी काढते. दोन बोटांमध्ये रांगोळी धरत दिनविशेषनुसार रांगोळी काढताना यात व्यक्‍तीचित्रांसह नो स्मोकिंग, पाणी आडवा पाणी जिरवा, कॅरिबॅग वापर टाळा, पाणी पुनर्भरण, झाडे लावा झाडे जगवा, महापुरुषांच्या जयंती व पुण्यतिथी, स्वदेशीचा वापर आदी प्रकारच्या रांगोळ्या तिने काढल्या आहेत.