Thu, Jun 20, 2019 20:41होमपेज › Marathwada › शासनाच्या शुभमंगल योजनेला यंत्रणेकडूनच खो!

शासनाच्या शुभमंगल योजनेला यंत्रणेकडूनच खो!

Published On: Mar 18 2018 1:46AM | Last Updated: Mar 18 2018 1:44AMआर्वी : प्रतिनिधी

महाराष्ट्र शासनाने शेतकरी व शेतमजुरांच्या मुलींसाठी शुभमंगल सामूहिक विवाह योजनेची घोषणा मोठ्या दिमाखाने केली मात्र प्रशासकीय यंत्रणेच्या दिरंगाईमुळे या योजनेला अद्यापही खो दिला जात आहे. यामुळे गरीब शेतकरी व शेतमजुरांच्या मुलींचे विवाह लांबणीवर पडत आहेत. 

मागील काही वर्षांपासून शेती व्यवसाय कोलमडला असून यामुळे शेतकरी व शेतमजुरांची आर्थिक स्थिती ढासळली आहे. यामुळे जिल्ह्यातील कित्येक शेतकरी आपल्या लाडक्या मुलींच्या बाबतीत यंदा कर्तव्य नाहीचा पाढा वाचत विवाह पुढे ढकलत आहेत. शासनाच्या महिला व बालकल्याण विभागाकडून शुभमंगल सामूहिक विवाह योजनेचा प्रारंभ केला आहे, परंतु या योजने बाबतीत विभागाकडून योग्य जनजागृती होत नसल्याने शेतकरी व शेतमजूर यो कल्याणकारी योजनेला मुकले जात आहेत.

लाभार्थ्यांसाठी अशा आहेत अटी

या योजनेच्या अनुदानास पात्र ठरण्यासाठी वार्षिक उत्पन्न कमाल मर्यादा 1 लाख रुपये आहे. या योजनेंतर्गत शेतकरी व शेतमजूर कुटुंबातील मुलींच्या विवाहासाठी आवश्यक असलेल्या मंगळसूत्र व इतर वस्तूंची खरेदीसाठी प्रतिजोडपी 10 हजार रुपये अनुदान वधूच्या आईच्या नावे दिली जाते.आई नसल्यास वडिलांच्या नावाने दिली जाते. आई-वडील दोघेही हयात नसल्यास वधूच्या नावाने देण्यात येते. सामूहिक विवाहाचे आयोजन विवाह समारंभाच्या खर्चासाठी 2  हजार रुपये अनुदान दिले जाते. शुभमंगल सामूहिक नोंदणीकृत विवाह योजना संपूर्णपणे जिल्हा नियोजन विकास समितीमार्फत राबविण्यात येते. योजनेच्या लाभासाठी वधू महाराष्ट्रातील संबंधित जिल्ह्याची स्थानिक रहिवासी असावी, संबंधित व्यक्तीकडे दाखला असावा लागतो.

Tags : Shubhamangal, Group, Wedding, Scheme, issue, Marathwada news