Wed, Apr 01, 2020 08:13होमपेज › Marathwada › बीड : भगवानगडावर चोरी, रायफल, तलवार लंपास 

बीड : भगवानगडावर चोरी, रायफल, तलवार लंपास 

Last Updated: Feb 27 2020 5:15PM

संग्रहित छायाचित्रबीड : पढारी वृत्तसेवा 

लाखो भक्ताचे श्रद्धास्थान असलेल्या भगवान गड येथे बुधवारी रात्री चोरी झाली. गडावरील रायफल, तलवार, इतर ऐतिहासिक वस्तू चोरट्यांनी लंपास केल्या. अहमदनगर व बीड जिल्ह्याच्या सीमेवर भगवान गड आहे. संत भगवेनबाबा यांनी स्थापन केलेल्या या गडावर सध्या महंत डॉ. नामदेवशास्त्री मठाधिपती आहेत. या गडावर संत भगवानबाबा यांच्यापासून असलेल्या पुरातन वस्तुंचे वस्तुसंग्रहालय आहे. या गडावर बुधवारी रात्री तिघे चोरटे दुचाकीवरून आले. त्यांनी रायफल, तलवार व इतर ऐतिहासिक साहित्य लंपास केले. हा सर्व प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. 

स्थानिकांचा विरोध आणि प्रशासनाचा ढिसाळपणा आष्टीकरांची कोरड वाढविणार

दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच सहाय्यक पोलिस निरीक्षक दिलीप राठोड यांनी घटनास्थळी भेट दिली.