Wed, Jul 15, 2020 18:20होमपेज › Marathwada › जिल्हाभरात शिवसेनेचे चक्काजाम आंदोलन

जिल्हाभरात शिवसेनेचे चक्काजाम आंदोलन

Published On: May 06 2018 1:09AM | Last Updated: May 06 2018 12:01AMपरभणी : प्रतिनिधी 

पीकविमा प्रकरणी शेतकर्‍यांची फसवणूक करणार्‍या विमा कंपनी व कृृषी विभागावर गुन्हे दाखल करावे तसेच बोंडअळी अनुदान तत्काळ द्यावे या मागणीसाठी शिवसेनेच्या वतीने 5 मे रोजी सकाळी 10 वाजल्यापासून जिल्हाभरात विविध राज्य महामार्गांवर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यामुळे तब्बल दोन तास जिल्ह्यातील वाहतूक ठप्प झाली होती.  

झिरो फाटा ः येथे शिवसेनेच्या वतीने चक्काजाम आंदोलन करण्यात आले. यावेळी शेकडो शिवसैनिक रस्त्यावर उतरले. आंदोलनामुळे रस्त्याच्या दोन्ही बाजूने वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. दरम्यान काही तासानंतर खा.संजय जाधव हे आंदोलनस्थळी दाखल झाले. यानंतर आंदोलनाचा समारोप करण्यात आला. यावेळी उपजिल्हा प्रमुख दशरथ भोसले, माणिक पोंढे, तालुकाप्रमुख काशीनाथ काळबांडे, शहरप्रमुख नितीन कदम, संतोष एकलारे, प्रकाश कर्‍हाळे, जि.प.सदस्य राजू चापके, नगरसेवक श्याम कदम, आदी उपस्थित होते. 

सेलू फाटा ः मानवत रोड येथील सेलू फाटा येथे शिवसेनेचे तालुकाप्रमुख विष्णु मांडे यांच्या नेतृत्वाखाली तालुका संघटक गणेश जाधव, पं.स. सभापती बंडु मुळे, खरबा येथील सरपंच रामप्रसाद निर्मळ, अवधुत शिंदे, नारायण भिसे आदी सहभागी होते.  यावेळी नायब तहसीलदार शे. वसीम यांना निवेदन देण्यात आले. 

मानवत ः शहरातील महाराणा प्रताप चौकात शहरप्रमुख राजेश कच्छवे यांच्या नेतृत्वाखाली माजी शहरप्रमुख अनिल जाधव, नरेश गौड, माणिक काळे, संतोष जाधव, राम दहे, शंकर क्षीरसागर, राजू महिपाल, बबलू राजे, यांनी आंदोलनात सहभाग नोंदवला. दरम्यान प्रभारी तहसीलदार नकुल वाघुंडे यांना निवेदन देण्यात आले.
सोनपेठ ः  तालुक्यातील शेतकरी बांधवांच्या विविध मागण्यांसाठी शासनाचे लक्ष वेधण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज चौकात शिवसेना तालुका प्रमुख रंगनाथ रोडे यांच्या नेतृत्वात रास्ता रोको करुन प्रशासनास  निवेदन देण्यात आले. यावेळी रामेश्‍वर मोकाशे, जनार्धन झिरपे,भगवान पायघन यांच्यासह तालुक्यातील असंख्य शिवसैनिक उपस्थित होते.

पाथरी ः  तालुक्यातील आष्टी फाटा, बाभळगाव फाटा आणि पोखर्णी फाटा या तिन्ही ठिकाणी तब्बल दोन तास रास्ता रोको आंदोलन झाले. यावेळी शिवसेना तालुका प्रमुख रविंद्र धर्मे, तालुका संघटक मुंजाभाऊ कोल्हे, शहर प्रमुख राहुल पाटील, माजी जिल्हा उपाध्यक्ष सुरेश ढगे, जि.प.सदस्य माणिक घुंबरे, पिंटू आमले, रावसाहेब निकम, हरिभाऊ वाकणकर आदी पदाधिकारी सहभागी झाले होते.
पालम ः  शिवसेनेचे गंगाखेड विधानसभा प्रमुख संतोष मुरकुटे यांच्या नेतृत्वाखाली  लोहा-गंगाखेड रोडवरील शहरातील मुख्य चौकात  तालुकाप्रमुख हनुमंत पौळ, शहर प्रमुख गजानन पवार, संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष पांडुरंग होळगे, माजी सरपंच भास्करराव सिरस्कर, सुभाष धुळगुंडे, तुकाराम कराळे, एकनाथ मोहिते, बालाजी लोखंडे, आनंद साकला, आदी शिवसैनिकांसह शेतकरी मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी  होते. याप्रसंगी तहसील कार्यालयाचे कारकून भदाले यांनी निवेदन स्विकारले. यावेळी पोलिस निरीक्षक महेश शर्मा, जमादार काळे, शिनगारे, पाडुंरंग कातकडे, पोले, नरगंले यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.

देवगाव फाटा ः येथे विधानसभा प्रमुख राम पाटील खराबे व तालुकाप्रमुख रणजित गजमल यांच्या नेतृत्वाखाली उपतालुका प्रमुख रामेश्‍वर बहिरट, शेषेराव वाघमोडे, माऊली बुधवंत, लक्ष्मण काळे, बाबाराव बुधवंत, रंगराव सातपुते, सुनील मुरकुटे, दत्ता मोगल, अमोल सातपुते, बाळू मोरे, अमोल मोरे, गणेशराव मुसळे शिवसेनेचे कार्यकर्ते व शेतकरी मोठया प्रमाणात आंदोलनात सहभागी झाले होते. नायब तहसीलदार सोनवणे यांनी  निवेदन स्वीकारले.यावेळी सहायक पोलीस निरीक्षक रत्नाकर घोळवे यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.

झरी ः नांदापूर येथे शेतकर्‍यांच्या प्रश्‍नांवर डॉ. मदन लांडगे यांच्या नेतृत्वाखाली  दोन तास रास्तारोको आंदोलन झाले. आंदोलनात नांदापूर पंचायत समिती गणातील बहुसंख्य शेतकर्‍यांसह जि.प.सदस्य गजानन देशमुख, मारुती ईक्कर (कुंभारी), अर्जुन रणेर(डिग्रस), अमोल भिसे व विनायक मुंडे(करडगाव), गजानन गायकवाड व शिवाजी शेंद्रे (सनपुरी), नांदापुरचे सरपंच सुमित लांडगे व शिवसैनिक सहभागी झाले होते.
ताडकळस : येथे रास्ता रोको आंदोलनात कृउबासचे संचालक दिलीपराव अंबोरे,  माजी सभापती चंद्रकांत रूद्रवार, रामराव अंबोरे, नरहरी रूद्रवार, पांडुरंग पौळ, सुरेश मगरे, अनिल नरवटे, माजी जि.प.सदस्य माणिक हजारे, केशव सलगर, गणेश गाढवे, राहुल सवंडकर, कैलास सलगर, बालासाहेब माने, राज चिमटे, मदनराव अंबोरे, प्रकाश फुलवरे यांच्यासह शिवसैनिक व शेतकरी मोठया संख्येने सहभागी झाले होते. 

ब्राह्मणगाव फाटा : येथे शिवसेनेच्या वतीने रास्तारोको आंदोलन करण्यात आले. यावेळी रावसाहेब रेंगे, दिलीप अवचार, रविराज देशमुख, पंढरीनाथ घुले, संजय कच्छवे, खवले आदींसह शिवसैनिक व शेतकरी मोठ्या संख्येने 
सहभागी झाले होते.