Fri, Mar 22, 2019 05:33
    ब्रेकिंग    होमपेज › Marathwada › शिवसेनेचा जल्‍लोष

शिवसेनेचा जल्‍लोष

Published On: May 25 2018 1:10AM | Last Updated: May 24 2018 10:54PMपरभणी : प्रतिनिधी

शिवसेना-भाजपचे उमेदवार विप्लव बाजोरिया यांच्या विजयानंतर आनंद द्विगुणीत झालेल्या शिवसेना पदाधिकारी व कार्यकत्यार्र्ंनी 24 मे रोजी सकाळी विजयाची बातमी मिळताच जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात विजयोत्सव साजरा केला. यावेळी ढोलताशांच्या गजरात आ.बाजोरिया यांची शहरातून विजयी मिरवणूक काढली. शिवसेनेने पहिल्यांदाच स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत विजय मिळविल्याने विकासाची संधी दिल्याचे समाधान शिवसेना पदाधिकार्‍यांच्या चेहर्‍यावर दिसून आले. 

स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारावर 35 मतांनी मात करणार्‍या आ. बाजोरियांच्या मिरवणुकीने परभणी शहर दणाणून गेले. गेल्या तीन दिवसांपासून या निवडणुकीच्या निकालाची उत्सुकता परभणीकरांना लागली होती. ती उत्सुकता विप्लव बाजोरिया यांच्या विजयाने पूर्ण होताच शिवसेनेच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी परिसरात गर्दी केली.

सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास विजयाची बातमी जिल्ह्यातील कानाकोपर्‍यात पसरली. शिवसेना पदाधिकार्‍यांनी बाजोरियांच्या मिरवणुकीत सहभागी होण्यासाठी हजेरी लावली. सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून शिवसैनिकांनी अभिवादन केले. यावेळी खा. संजय जाधव, आ. डॉ. राहुल पाटील, आ. गोपिकिशन बाजोरिया, आ. जयप्रकाश मुंदडा, डॉ.विवेक नावंदर, जिल्हा प्रमुख विशाल कदम, जिल्हाप्रमुख डॉ. संजय कच्छवे, जि.प. गटनेते राम खराबे पाटील यांच्यासह शिवसेना नगरसेवक, जि.प.सदस्य व पदाधिकारी उपस्थित होते. यानंतर शहरातील मुख्य रस्त्यावरून ढोलताशांच्या गजरात विजयी मिरवणूक निघाली. मिरवणुकीचा समारोप शिवाजी चौकात झाला. यानतर आ. बाजोरिया हे जिल्ह्यातील त्यांचे कुलदैवत असलेल्या सोनपेठ येथील नागठाणाकडे रवाना झाले.