Sun, Jul 21, 2019 07:49होमपेज › Marathwada › जयमहेश कारखान्यावर शिवसेनेचे धरणे 

जयमहेश कारखान्यावर शिवसेनेचे धरणे 

Published On: Mar 11 2018 1:19AM | Last Updated: Mar 11 2018 1:03AMमाजलगाव : प्रतिनिधी

तालुक्यातील पवारवाडी येथील जय महेश या खासगी साखर कारखान्याने शेतकर्‍यांच्या उसाचे करोडो रुपये व तसेच तोडणी ठेकेदार, वाहतूक ठेकेदार यांचे पैसे तत्काळ द्यावेत या मागणीसाठी शनिवारी शिवसेनेच्या वतीने चार तास धरणे आंदोलन करण्यात आले.

जय महेश साखर कारखान्याकडून मागील तीन महिन्यांपासून गाळप करण्यात आलेल्या उसाची रक्कम शेतकर्‍यांना देण्यात आलेली नाही. त्यामुळे ऊस उत्पादक शेतकरी आर्थिक अडचणीत आला. शेतकर्‍यांना रक्कम तत्काळ द्यावी मागणीसाठी शिवसेना जिल्हाप्रमुख सचिन मुळूक व आप्पासाहेब जाधव यांच्या नेतृत्वाखाली शिवसैनिकांनी कारखान्यावर चार तास धरणे आंदोलन केले. यावेळी शिवसेनेने  कारखाना प्रशासनाच्या विरोधात घोषणाबाजी केली. डिसेंबर व जानेवारी महिन्याचे थकलेले पैसे मार्च महिना अखेरीस देणार असल्याचे कारखान्याचे व्यवस्थापकीय संचालक गिरीष लोखंडे यांनी लेखी पत्राद्वारे आश्वासन दिले आहे. यावेळी वडवणी तालुकाप्रमुख विनायक मुळे, अ‍ॅड. दत्ता रांजवण, अशोक आळणे, नितीन मुंदडा, अमोल डाके, दासू बादाडे, अतुल उगले, कल्याण बल्लाळे, शिवमूर्ती कुंभार, रामराजे रांजवण, विठ्ठल जाधव, हरिभाऊ जाधव  आदींसह शेतकरी व शिवसैनिकांची उपस्थिती होती.