Tue, Aug 20, 2019 04:09होमपेज › Marathwada › झेंडे, कमानींनी बीडकरांचा शिवजन्मोत्सव भगवामय

झेंडे, कमानींनी बीडकरांचा शिवजन्मोत्सव भगवामय

Published On: Feb 17 2018 2:07AM | Last Updated: Feb 17 2018 1:11AMबीड : प्रतिनिधी

छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्मोत्सव अवघा दोन दिवसांवर आला आहे. तरुणांनी   दुचाकी, चारचाकी वाहनांवर ध्वज लावून शिवजन्मोत्सवाची तयारी सुरू केली आहे. बीड शहरातील मुख्य रस्ते, चौक भगव्या ध्वजांनी व कमानींनी सजले आहेत.

छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्मोत्सव  19 फेबु्रवारी रोजी मोठ्या उत्साहात व थाटामाटात साजरा केला जातो.  सार्वजनिक शिवजन्मोत्सवासह अनेक तरुण मंडळे, शहरातील प्रमुख नगर, कॉलनी, पक्ष, संघटना आदी मोठ्या प्रमाणावर शिवजन्मोत्सव साजरा करतात. 

छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसर, अण्णा भाऊ साठे पुतळा परिसर, सुभाष रोड, जालना रोड, राजुरी वेस, नगर रोड, शाहू नगर, स्टेडिअम परिसर आदींसह संपूर्ण शहरात अनेक ठिकाणी उंचचउंच ध्वज  लावण्यात आले आहेत. यांसह अनेक ठिकाणी भव्य कमानी, मोठे ध्वजही लावण्यात आले आहेत. या ध्वजांवर शिवप्रतिमाही आहेत. 
स शहरातील मुख्य सार्वजनिक उत्सव समितीचे मार्गदर्शक संदीप क्षीरसागर, अध्यक्ष प्रा. विजय पवार यांच्यासह इतर ध्वज, कमान लावणे, शिवजन्मोत्सवातील कार्यक्रम या सर्वांची देखरेख करीत आहेत. 

स गल्लोगल्ली होणार्‍या कार्यक्रमांचीही जोरदार तयारी सुरू आहे. शहरातील अनेक भागांमध्ये मिरवणूक, व्याख्यान, रक्तदान शिबीर आदी सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.