Sun, Apr 21, 2019 03:50होमपेज › Marathwada › शिरूर न. पं. अपक्ष उमेदवार अपात्र

शिरूर न. पं. अपक्ष उमेदवार अपात्र

Published On: May 18 2018 1:18AM | Last Updated: May 18 2018 12:24AMशिरूर : जालिंदर नन्नवरे 

शिरूर नगर पंचायतीचा अडीच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झाल्याने पुढील अडीच वर्षांसाठी नगराध्यक्ष निवडीचा कार्यक्रम 25 मे रोजी पार पडणार आहे. यामुळे शिरूर नगर पंचायती मध्ये राजकीय घडामोडीला चांगलाच वेग आला आहे. याच पार्श्‍वभूमीवर राष्ट्रवादीशी हातमिळवणी करणारे अपक्ष नगरसेवक भीमराव देवराव गायकवाड यांना चार अपत्य असल्याने जिल्हाधिकारी एम. देवेंद्र सिंह यांनी अपात्र घोषित केले आहे. यामुळे नगराध्यक्ष निवडीच्या आगोदरच राष्ट्रवादीच्या अडचणीत वाढ झाली आहे.

भीमराव गायकवाड यांना चार अपत्य असून, निवडणूक शपथपत्रात दोन अपत्याचा उल्लेख केला होता. याप्रकरणी विनोद इंगोले त्यांना नगरसेवक पदावरून अपात्र करण्याबाबत जिल्हाधिकार्‍यांकडे याचिका दाखल केली होती. त्याबाबत त्यांनी सादर केलेल्या साक्षी पुराव्यावरून भीमराव गायकवाड यांना नगरसेवक पदावरून अपात्र करण्याचे आदेश जिल्हाधिर्‍यांनी दिले आहेत. माजी मंत्री सुरेश धस यांच्याकडून राष्ट्रवादीला हा धक्का समजला जात आहे.

शिरूर नगर पंचायत एकूण 17 नगरसेवक असून, त्यानुसार या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस धस गट 10 व भाजपचे 6 आणि अपक्ष 1 धस गट असे 17 उमेदवार निवडून आलेले आहेत. मात्र मागील तीन महिन्यांपासून राष्ट्रवादीचे 7, अपक्ष 1 व भाजप 1 अशा 9 सदस्यांनी विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे व संदीप क्षीरसागर यांच्या सोबत जाण्यास समाधान मानले. 25 तारखेल्या होणार्‍या नगराध्यक्षाच्या निवडीत राष्ट्रवादीकडून राजकीय आखणी केली होती, परंतु सदस्यांच्या अपात्रतेच्या निर्णयामुळे पक्षासमोरील अडचणी वाढल्या असून, सध्या राष्ट्रवादी व भाजप समान मतात असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. यामुळे नगराध्यक्षाची निवड रंगतदार होण्याची शक्यता आहे.