Thu, Nov 15, 2018 03:13होमपेज › Marathwada › शरद पवारांचा लातूर दौरा अचानक रद्द

शरद पवारांचा लातूर दौरा अचानक रद्द

Published On: Mar 03 2018 3:47PM | Last Updated: Mar 03 2018 3:47PMलातूर : प्रतिनिधी

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष, खासदार शरद पवार यांनी अचानक लातूर दौरा रद्द केला. त्यानंतर ते राजनीहून थेट पुण्याकडे रवाना झाले. लातूर  येथे शिवछत्रपती शिक्षण संस्थेच्या सुवर्ण महोत्सवाची सांगता व विविध ग्रंथाचे प्रकाशन त्यांच्या उपस्थितीत होणार होते.

याबाबत मिळालेली माहितीनुसार,‘एका शिक्षण  संस्थेची स्मरणिका, डॉ. गोपाळराव पाटील यांचे आत्मकथन तसेच ॲड. मनोहरराव गोमारे यांच्या आत्म.चरित्राचे प्रकाशन पवार यांच्या उपस्थितीत होणार होते. या दोन्ही कार्यक्रमाची तयारी झाली होती. विश्राम ग्रहावर कार्यकर्ते, पदाधिकारी  पवारांच्या स्वागतासाठी सज्ज होते. पण शरद पवार यांच्या  परिवारातील एका सदस्याची प्रकृती  गंभीर असल्याचा निरोप मिळाल्याने ते तातडीने रांजनीहून पुण्याला रवाना झाल्याचे सांगण्यात आले

शरद पवार पुण्याला परतल्याने त्यांच्या उपस्थित होणारे नियोजित कार्यक्रम अन्य मान्यवरांच्या उपस्थतीत पार पडणार असल्याचे संयोजकांच्या वतीने सांगण्यात  आले.