Thu, Nov 15, 2018 15:49होमपेज › Marathwada › शिवशाहीच्या तिकिटात ज्येष्ठ नागरिकांना सवलत

शिवशाहीच्या तिकिटात ज्येष्ठ नागरिकांना सवलत

Published On: Jun 01 2018 2:07AM | Last Updated: May 31 2018 10:57PMपरभणी : प्रतिनिधी

राज्य परिवहन महामंडळाच्या बसमधून प्रवास करणार्‍या ज्येष्ठ नागरिकांना एसटीच्या 70 व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून शिवशाही व वातानुकूलित बसमध्ये ज्येष्ठांना आता 1 जूनपासून तिकिटात सवलत देण्याचा निर्णय परिवहनमंत्री यांनी नुकताच घेतला आहे. 

आजच्या स्थितीला राज्य परिवहन महामंडळाच्या साध्या सेवा, रातराणी व निमआराम बसेसमध्ये ज्येष्ठ नागरिकांना तिकीट दरात 50 टक्के सवलत दिली जाते. अशा प्रकारची सवलत ही नव्यानेच सुरू करण्यात आलेल्या शिवशाही व वातानुकूलित बसमध्ये दिली जात नाही. यामुळे ज्येष्ठ नागरिकांना या बसमधून प्रवास करणे कठीण बनले होते. ही सवलत शिवशाहीतही मिळावी अशी मागणी परिवहनमंत्री दिवाकर रावते यांच्याकडे झाली होती.

याची दखल घेत रावते यांनी याबाबत एसटी प्रशासनास प्रस्ताव तयार करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार सध्या सुरू असलेल्या वातानुकूलित शिवशाहीच्या आसन श्रेणीतील बसेसमध्ये एकूण तिकीट मूल्याच्या 45 टक्के तर वातानुकूलित शिवशाहीच्या शयनयान श्रेणीतील बसेसमध्ये 30 टक्के सवलत देण्याचा निर्णय घेतला. ज्येष्ठ नागरिकांना या बसेसमधून सदरील सवलतीचा लाभ हा 1 जून रोजीपासून दिला जाणार असल्याची माहिती विभाग नियंत्रक जालिंदर सिरसाट यांनी दिली आहे.