Thu, Aug 22, 2019 08:12होमपेज › Marathwada › सेलूत थकबाकीदारांविरुद्ध महावितरणची कडक मोहीम

सेलूत थकबाकीदारांविरुद्ध महावितरणची कडक मोहीम

Published On: Feb 14 2018 2:53AM | Last Updated: Feb 14 2018 2:33AMसेलू ः प्रतिनिधी

शहरासह ग्रामीण भागातही महावितरणच्या विविध ग्राहक अथवा संस्थेकडील थकबाकी वसुलीची मोहीम सुरू करण्यात आली आहे. प्रत्येक ग्राहकाने थकबाकी भरावी नाहीतर वीज तोडा अशा अंमलबजावणीमुळे थकबाकीदार ग्राहक व संस्थाना यापुढे बिल भरणे अनिवार्य झाले आहे. महावितरणच्या वरिष्ठ कार्यालयाकडून सेलू येथील उपकार्यकारी अधिकार्‍यांना आलेल्या आदेशानुसार सेलू शहरासह तालुक्यातील सर्वच थकबाकीदारांची वसुली करा नसता थकबाकीदारांची वीज तोडा याप्रमाणे मागील दोन दिवसांपासून तालुक्यातील वीज बिलांची वसुली मोहीम सुरू करण्यात आली असून यात ग्रामीण भागातील 97 पाणी पुरवठा योजनेची तर 70 टक्के पथदिव्याची वीज तोडली गेली आहे. यामुळे अंधारातील ग्रामीण भागांना पिण्याच्या पाण्याचा प्रश्नदेखील उभा राहिला आहे. 

ग्रामीण भागातील सार्वजनिक पाणीपुरवठा योजनेतील एकूण 103 विद्युत पंपांपैकी 97 विद्युतपंपांकडे 2 कोटी 58 लाख रुपये तर एकूण 103 पथदिव्यांच्या जोडणीसाठी 9 कोटी रुपये थकबाकी असल्याकारणाने 70 टक्के पथदिव्यांची विद्युतदेखील तोडण्यात आली आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील रस्ते अंधारात सापडले असून ग्रामीण भागाचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्नदेखील उभा राहिला आहे.