होमपेज › Marathwada › वन्यजिवांनी पाणवठे गजबजले

वन्यजिवांनी पाणवठे गजबजले

Published On: Mar 25 2018 1:25AM | Last Updated: Mar 25 2018 1:25AMआर्वी : जालिंदर नन्नवरे

फेब्रुवारी महिना उलटताच तालुक्यातील कित्येक गावात पाणी टंचाईने डोके वर काढले आहे. यामुळे मानवी जीवासह वन्यजिवाकडून पाण्याची शोधाशोध सुरू झाली आहे. यात पुन्हा तालुक्यातील डोंगराळ भागात याची भीषणता आणखी वाढली असून याच नामी संधीचा फायदा घेत खासगी पाणवठ्यावर शिकारी आपले सावज शोधत आहेत.

तालुक्यात उन्हाळ्याची झळ दर वर्षी भीषण रूप धारण करीत असते यासह तालुक्यात डोंगराळ भाग मोठ्या प्रमाणावर असल्याने वन्यजिवही मोठ्या प्रमाणात आढळतात उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर वन्य विभागाकडून वन्यजिवाची तहान भागवण्यासाठी आटोकाट प्रयत्न केले जात असतात, परंतु वनविभागाला यात मोठे यश मिळत नसल्याने वन्यजिवाची पाण्यासाठीची होरपळ कायम पाहण्यासाठी मिळत असते. यामुळे उन्हाळा स्थितीत पाण्याच्या शोधात असलेले वन्यजिव शिकार्‍याचे सहज सावज होत आहेत.

उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर सध्या तालुक्यातील मातोरी, आनंदगाव, तागडगाव, जांब, नारायणगड, तरडगव्हण, तिंतरवणी, पिंपळनेर, दहिवंडी या ठिकाणच्या भागात वन्यजिव पाण्यासाठी बाहेर पडत असल्याचे चित्र पाहण्यासाठी मिळत आहे. यामुळे यातील बर्‍याच ठिकाणी वनविभाग पानवठ्यात पाणी सोडण्याचे काम करीत आहे, परंतु खासगी पाणवठ्यावर नियंत्रण ठेवणे विभागाला शक्य होत नाही.

Tags : Marathwada, Marathwada News, Seeking, water, wildlife, started