Thu, Apr 25, 2019 04:01होमपेज › Marathwada › शास्त्रज्ञ, अधिकार्‍यांनी क्षमतेने कार्य करावे : डॉ. ढवण 

शास्त्रज्ञ, अधिकार्‍यांनी क्षमतेने कार्य करावे : डॉ. ढवण 

Published On: Jun 03 2018 1:15AM | Last Updated: Jun 02 2018 11:35PMपरभणी : प्रतिनिधी

शेतकर्‍यांच्या गरजेच्या दृष्टीने विद्यापीठाने अनेक चांगले कृषी तंत्रज्ञान विकसित केले आहे. विद्यापीठाची कृषी विस्तार यंत्रणा व कृषी विभाग यांच्या सहकार्याने प्रभावीपणे ते त्यांच्यापर्यंत पोहचवावे लागेल. विद्यापीठातील अनेक पदे रिक्त असल्यानेे मनुष्यबळाची मोठी कमतरता आहे. यामुळे कृषी शिक्षण, संशोधन व कृषी विस्तार कार्यावर मर्यादा येत आहेत, पण शेतकर्‍यांना व विद्याथ्यार्र्ंना विद्यापीठाकडून अनेक अपेक्षा आहेत. यासाठी विद्यापीठात उपलब्ध शास्त्रज्ञ, अधिकारी व कर्मचार्‍यांनी जास्त क्षमतेने कार्य करावे, असे प्रतिपादन नूतन कुलगुरू डॉ.अशोक ढवण यांनी केले.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे अठरावे कुलगुरू म्हणून दि.1 जून रोजी डॉ.ढवण यांनी पदभार स्वीकारला. यावेळी माजी कुलगुरू डॉ बी. व्यंकटेश्वरलू यांना निरोप देण्यात आला. अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी पी.शिवशंकर होते. यावेळी आ. डॉ. राहुल पाटील, पोलिस अधीक्षक डॉ.दिलीप झळके,  डॉ.पी.आर.शिवपुंजे, डॉ.विलास पाटील, डॉ.दत्तप्रसाद वासकर, डॉ. प्रदीप इंगोले, डॉ. गजेंद्र लोंढे, विनोद गायकवाड, गंगाधरराव पवार उपस्थित होते.

डॉ. ढवण पुढे म्हणाले की, बदलत्या हवामानात काही कृषी तंत्रज्ञान कालबाह्य झाले असून बदलत्या हवामानास अनुकूल तंत्रज्ञान निर्मितीसाठी भर द्यावा लागेल. डॉ.व्यंकटेश्वरलू यांच्या कार्यकाळात विद्यापीठाच्या कोरडवाहू संशोधनास एक चांगली दिशा प्राप्त झाली असून तेच कार्य पुढे नेणार आहे. कृषी शिक्षणात विद्याथ्यार्र्ंच्या कौशल्य विकासावर भर देऊन त्यांना कृषी उद्योजकतेचे धडे द्यावे लागतील, असे मत त्यांनी व्यक्त केले. माजी कुलगुरू डॉ.व्यंकटेश्वरलू म्हणाले की, पदाच्या चार वषार्र्ंच्या कार्यकाळात कर्मचारी, शेतकरी, लोकप्रतिनिधींनी सहकार्य केले. 

यामुळेच प्रकल्पग्रस्तांचा प्रश्न मार्गी लावता आला असे ते म्हणाले. कार्यक्रमात ढवण व व्यंकटेश्वरलू यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक कुलसचिव डॉ.गजेंद्र लोंढे यांनी केले. सूत्रसंचालन डॉ.विना भालेराव यांनी तर आभार डॉ.सय्यद इस्माइल यांनी मानले. कार्यक्रमास प्रगतशील शेतकरी कांतराव देशमुख, अ‍ॅड. अशोक सोनी आदींसह विद्यापीठातील अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते.