Wed, Nov 21, 2018 17:25होमपेज › Marathwada › अश्लील फोटो दाखवून विद्यार्थीनींवर शिक्षकाचा लैगिक अत्याचार

अश्लील फोटो दाखवून विद्यार्थीनींवर शिक्षकाचा लैगिक अत्याचार

Published On: Dec 11 2017 1:47PM | Last Updated: Dec 11 2017 1:47PM

बुकमार्क करा

बीड : प्रतिनिधी 

बीड जिल्ह्यातील ढोरवाडी (ता.वडवणी) येथे मोबाईलवर अश्लील फोटो दाखवून एका शिक्षकाने विद्यार्थीनींवर लैगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. जिल्हा परिषदेच्या शाळेत इयत्ता तिसरी व चौथीच्या वर्गात शिकणा-या तीन विद्यार्थीनींवर अत्याचार करणाऱ्या शिक्षकाविरुद गुन्हा दाखल झाला आहे.

दिगंबर श्रीराम शिंदे असे शिक्षकाचे नाव आहे. या शिक्षकाने तीन विद्यार्थीनींना एका वर्गाच्या खोलीत बोलावले आणि त्यांना अश्लील फोटो दाखवत विद्यार्थीनींवर लैंगिक अत्याचार केले. तसेच हा प्रकार कोणाला सांगितल्यास जीवे मारण्याची धमकीही त्याने दिली. याबाबत मुलींच्या कुटुंबियांनी फिर्याद दिली. फिर्यादीवरुन वडवणी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून शिक्षकाला अटक करण्यात आली आहे. गाम्रस्थांनी या शिक्षकांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली. या प्रकरणाचा पुढील तपास फौजदार सोनवणे करीत आहेत.