Thu, Apr 18, 2019 16:03होमपेज › Marathwada › रजिस्ट्री ऑफिसमध्ये स्कॅनर मशीन उपलब्ध 

रजिस्ट्री ऑफिसमध्ये स्कॅनर मशीन उपलब्ध 

Published On: Apr 25 2018 12:57AM | Last Updated: Apr 24 2018 11:08PMगेवराई : प्रतिनिधी

येथील दुय्यम निबंधक कार्यालयातील स्कॅनर मशीन मागील तीन महिन्यांपासून बंद असल्याने, दस्तावेज नोंदणीचे काम रखडले होते. परिणामी शेतकरी, नागरिकांची कामे खोळंबली होती. यामुळे कार्यालयात चकरा मारण्याबरोबरच त्यांना आर्थिक भुर्दंड तसेच मनस्ताप सहन करावा लागत होता. कार्यालयातील अव्यवस्थेमुळे शेतकरी तसेच नागरिकांमधून संताप व्यक्त केला जात होता. याबाबत सर्वप्रथम दै. पुढारीने मॅजिस्ट्री ऑफीसमधील मशीन तीन महिन्यांपासून बंद या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित केल्यानंतर संबंधित विभागाने या कार्यालयाला सोमवारी दोन स्कॅनर मशीन उपलब्ध करून दिल्या. यामुळे नागरिकांची रखडलेली दस्तावेजाची कामे कामे झाल्याने समाधान व्यक्त होत आहे.

दुय्यम निबंधक कार्यालयात तालुक्यातील शेतकरी तसेच नागरिकांची जमीन, प्लॉट खरेदी विक्री तसेच बँक कर्जप्रकरणी गहाणखत आदी कामे केली जातात, मात्र येथील स्कॅनर मशीन तीन महिन्यांपूर्वी खराब झाल्याने, तेव्हापासून ती बंद-धूळखात पडलेली होती. शेतकरी, नागरिकांची जमीन प्लॉट, गहाणखत नोंदणी केलेले दस्तावेज स्कँन अभावी ते पेंडिंग होती. परिणामी दस्तावेज स्कॅनर होत नसल्याने पक्षकारांना दस्तावेज वेळेवर मिळत नव्हते. त्यामुळे या कार्यालयात चकरा मारून नागरिक वैतागले होते. याबाबत सर्वप्रथम दै.पुढारी ने 21 एप्रिल रोजी वृत्त प्रकाशित करून केले होते. यानंतर येथील दुय्यम निबंधक कार्यालयात वरिष्ठ कार्यालयाकडून दोन स्कॅनर मशीन उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. यामुळे मागील काही दिवसांपासून रखडलेली दस्तावेज स्कॅनची कामे सुरू झाली असल्याने, नागरिकांमधून समाधान व्यक्त केले जात आहे.