Sun, Apr 21, 2019 06:06होमपेज › Marathwada › द्रोण, पत्रावळी उद्योगांना मिळणार संजीवनी

द्रोण, पत्रावळी उद्योगांना मिळणार संजीवनी

Published On: Jul 04 2018 2:25AM | Last Updated: Jul 04 2018 2:22AMअंबाजोगाई : रवी मठपती 

प्लास्टिक बंदीमुळे द्रोण, पत्रावळी उद्योगांना संजीवनी मिळणार आहे. किराणा बाजारपेठेतून व्यापार्‍यांनी प्लास्टिक व थर्माकोलच्या पत्रावळी, द्रोण, ग्लास, वाटी इत्यादी वस्तू हद्दपार केल्या आहेत. बाजारात प्लास्टिक द्रोण, पत्रावळी घेऊन येणार्‍या ट्रका गेल्या आठवड्यापासून बंद झाल्या असल्याचे व्यापार्‍यांनी सांगितले.

हायटेक जमाण्यात नामशेष होत आलेल्या पळस पानाच्या द्रोण पत्रावळीची जागा प्लास्टिकने झपाट्याने घेतली, मात्र आता शासनाच्या प्लास्टिक बंदीच्या निर्णयाने पळस पानाच्या द्रोण पत्रावळीच्या व्यवसायाला नव्याने झळाळी येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. 

कागदापासून द्रोण पत्रावळी बनविण्याच्या उद्योगात नशीब अजमावित असताना यापूर्वी अडचणीत आलेल्या   उद्योजकांच्या चेह-यावर प्लास्टिक बंदीमुळे सध्या आनंद पाहायला मिळत आहे.