होमपेज › Marathwada › संग्राम करडेकरची गुगलच्या डाटा विश्‍लेषकपदी निवड

संग्राम करडेकरची गुगलच्या डाटा विश्‍लेषकपदी निवड

Published On: Jul 05 2018 1:39AM | Last Updated: Jul 04 2018 10:35PMपरभणी : प्रतिनिधी 

गुगल या लोकप्रिय इंटरनेट सर्व्हरच्या डाटा विश्‍लेषक पदावर नियुक्‍ती मिळवून संग्राम सुनील करडेकर यांनी शैक्षणिकदृष्ट्या परभणीच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. संग्रामने दहावीला असताना परभणी शहरातून प्रथम क्रमांक मिळविला होता. त्यानंतर बारावीतही चांगल्या प्रकारचे यश मिळवून पुणे येथील एका नामांकित अभियांत्रिकी महाविद्यालयातून संगणकशास्त्रातून अभियांत्रिकीची पदवी मिळविली.  संग्राम हा येथील प्रसिद्ध बालरोगतज्ञ डॉ. सुनील करडेकर यांचा मुलगा आहे.

वडिलांच्या वैद्यकीय क्षेत्रात जाण्याऐवजी स्वतःचे वेगळे करिअर निवडून त्यात परिश्रम घेण्याचा संकल्प केला होता. त्यातून त्याने पुणे येथून अभियांत्रिकी पदवी अभ्यासक्रम पूर्ण केला. त्यानंतर त्याने अमेरिकेतील कॅलिफोर्नियातील संन्टा क्लारा विद्यापीठामधून माहिती व तंत्रज्ञान विषयात विशेष प्राविण्यासह उच्च पदवी प्राप्त केली. त्यानंतर वयाच्या अवघ्या 28 व्या वर्षी संग्रामचे देदिप्यमान यश  आणि गुणवत्ता पाहून गुगलने त्याची दखल घेतली आहे. गुगल कंपनीने सिलिकॉन व्हॅली अमेरिका येथे डेटा विश्‍लेषक पदावर नोकरी करण्याची संधी प्राप्त करून दिली आहे. संग्रामच्या या यशाबद्दल त्याचे शहरातील सर्वक्षेत्रातून अभिनंदन करण्यात येत आहे.