Wed, Sep 19, 2018 20:15



होमपेज › Marathwada › बीड पालिकेच्या योजना कागदावर

बीड पालिकेच्या योजना कागदावर

Published On: Aug 17 2018 1:35AM | Last Updated: Aug 17 2018 1:35AM




बीड : प्रतिनिधी

पालिकेत गेल्या अनेक वर्षांपासून एक हाती सत्ता असणार्‍यांनी केवळ कागदावर योजना दाखवून कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप जिल्हा परिषद सदस्य संदीप क्षीरसागर यांनी केला. ते, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आयोजित धरणे आंदोलनादरम्यान बोलत होते. यावेळी  माजी आ. सय्यद सलीम, पालिकेचे गट नेते फारूक पटेल, उपनगराध्यक्ष हेमंत क्षीरसागर यांच्यासह सर्व नगरसेवक उपस्थित होते. 

बीड नगर पालिकेतील गैरकारभार, भ्रष्टाचार आणि नागरिकरिकांच्या प्रश्ना संदर्भात जिल्हाअधिकारी कार्यालयात निवेदन देण्यात आले आहे. अल्पसंख्याक मुलींच्या वस्तीग्रहासाठी खासबाग येथील जागा तात्काळ उपलब्ध करून देण्यात यावी, स्वछतेसाठी प्रत्येक प्रभागात एक जे. सि. बी. मशीन आणि वाढीव मजूर उपलब्ध करून देण्यात यावेत, शहराला काही भागात 5 दिवसा आड तर काही भागात 8 दिवसाआड पाणी पुरवठा करण्यात येतो. तो पाणी पुरवठा कसलाही भेदभाव न करता सरसकट दोन दिवसा आड करण्यात यावा, आ. जयदत्त क्षीरसागर यांनी घर क्र.1-3-1789 वर कोणत्याही नियमाचे पालन न करता देण्यात आलेली बांधकाम परवानगी तात्काळ रद्द करण्यात यावी व कादेशीर कार्यवाही करण्यात यावी , बोगस करण्यात आलेल्या मोमीनपूरा रस्त्याची सखोल चौकशी करून  सदरील कामांचे सर्व कागदपत्रे तात्काळ उपलब्ध करून देण्यात यावेत, आदी मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करण्यात आले.

यावेळी संदीप क्षीरसागर यांनी नगरपालीकेच्या कारभाराचे वाभाडे काढले. पालीकेत मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार बोकाळला असून विकासकामे केवळ कागदोपत्री करून भ्रष्टाचार केला जात असल्याचा आरोप त्यांनी केला. या सर्व प्रकाराची चौकशी करण्याची मागणीही संदीप क्षीरसागर यांनरी केली. ा धरणे आंदोलनात बबन गवते, नगरसेवक खदीर भाई जवारिवले, भाऊसाहेब डावकर , अमर नाईकवाडे, युराज जगताप, दिलीप भोसले, प्रेम चांदणे, रमेश चव्हाण, जयतुल्ला खान, सम्राट चव्हार, अश्फाक इनामदार, डॉ. इद्रिश हशमी, झुंझार धांडे, बाळासाहेब गुंजाळ, शेख अमेर, अशोक वाघमारे, खुर्शीद आलम, मुजीब, बाहेगव्हानकर आदी उपस्थित होते.