Sun, May 26, 2019 13:33होमपेज › Marathwada › अबब... सालगड्याचा पगार लाखाच्या घरात!

अबब... सालगड्याचा पगार लाखाच्या घरात!

Published On: Mar 11 2018 1:19AM | Last Updated: Mar 11 2018 12:37AMहिंगोली : प्रतिनिधी

दिवसेंदिवस शेतीमध्ये आधुनिक यांत्रिकीकरण करणाचा वापर करून शेती करणे सोपे झाले असले तरी जास्तीची जमीन असणार्‍या बड्या शेतकर्‍यांना मात्र सालगडी ठेवण्याशिवाय पर्याय नसल्याने सालगडी ठेवावाच लागतो, परंतु यावर्षी सालगड्याच्या पगारात घसघशीत वाढ झाली असून 90 हजार ते 1 लाख रुपयांपर्यंत सालगड्याकडून सालाची मागणी होत असल्याने बडे बागायतदार अडचणीत आले आहेत, सालगडी लावण्यापेक्षा शेती बटईने देण्यावरच अनेक शेतकर्‍यांचा भर राहत असल्याचे दिसून येत आहे.

कृषी संस्कृती व परंपरेनुसार शेतकर्‍यांचे नवे वर्ष गुढीपाडव्याला सुरू होते. परंपरेने चालत आलेल्या रुढीनुसार बडे शेतकरी पाडव्याच्या मुहूर्तावर सालगड्यांचा सौदा निश्‍चित करीत असतात. पाडव्याला आठवडा शिल्लक असल्याने ग्रामीण भागात सालगडी निश्‍चित करण्याची लगबग सुरू झाली आहे. मागच्या वर्षी सालगड्याला 70 हजार ते 90 हजारपर्यंत पगार देण्यात आला होता. यावर्षी मात्र सालगड्यांच्या पगारात घसघशीत वाढ झाली असूून किमान 90 हजार ते 1 लाखपर्यंतचा पगार सालगड्याकडून मागितला जात आहे. शेतीमध्ये ट्रॅकटरसह इतर यंत्रे उपलब्ध झाली असली तरी गुराढोरांसह इतर कामासाठी बड्या जमीनदारांना सालगड्यांची आवश्यकता असते. त्यानुसार सालगडी ठेवण गरजेचे असल्याने अडचण असूनही सालगडी ठेवणे गरजेचे आहे. मागील आठवडाभरापासून सालगडी निश्‍चित करण्याची लगबग सुरू असून चारचौघांच्या बैठकीत असून सुपारी फोडत सालगड्याचा पगार निश्‍चित केला जात आहे.

शेतकर्‍यांचा कल जमीन बटईने देण्यावर

15 वर्षांपूर्वी निम्मा माल व निम्मे पैसे असा सालगड्याचा पगार ठरविण्यात येत होता. आताम ात्र पगार हे रोखीने ठरविले जात आहे. त्यात मालाचा समावेश केला जात नाही. साल निश्‍चित झाल्यानंतर कामाला येण्यापूर्वी रोख 50 हजार रुपये घेऊन कामाला सुरुवात केली जाते. उर्वरित पैशाचे 2 टप्पे करून दिले जातात. पूर्वी गहू, ज्वारीसह तुरीची दाळ देण्याची प्रथा होती; परंतु सर्व व्यवहार रोखीने होत असल्याने मालाची परंपरा खंडित झाली आहे. सालगड्याचे पगार दर दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे जिल्हाभरातील अनेक बडे जमीनदार गावातील अल्पभूधारक शेतकर्‍यांना आपली जमीन बटईने देत आहेत. यातून दोघांचांही फायदा होत असल्यामुळे हळूहळू शेतकर्‍यांचा कल जमीन बटईने कसण्यासाठी देण्यावर दिसून येत आहे.