Sun, Jul 21, 2019 01:32होमपेज › Marathwada › चालक पंधरा वर्षांपासून पेन्शनच्या प्रतीक्षेत

चालक पंधरा वर्षांपासून पेन्शनच्या प्रतीक्षेत

Published On: Jan 16 2018 9:29AM | Last Updated: Jan 16 2018 9:26AM

बुकमार्क करा
औरंगाबाद :

देशकर जे. ई. कोणत्याही कार्यालयातील कर्मचार्‍यांनी  स्वेच्छा निवृती घेतली किंवा तो सेवानिवृत झाल्यास त्याला लवकरात लवकर पेन्शन व इतर आर्थिक लाभ संबिंधत विभागाकडून मिळणे अपिेक्षत आहे, परंतु एसटी महामंडळाने कहरच केला आहे. एका चालकाला तब्बल पंधरा वर्षे  खेट्या मारूनही पेन्शन व इतर आर्थिक लाभ त्याच्या हाती पडले नाहीत. आज त्या चालकावर उपासमारीची वेळ आली आहे. एवढे होऊनही वरिष्ठ इधकारी त्याची फाईल पाहून पुढील निर्णय घेऊ असे म्हणत या प्रकरणाला बगल देत आहेत.

सिल्लोड आगारात कार्यरत असलेले चालक सय्यद ताजअली सय्यद गफूर यांनी 31 मार्च 2003 रोजी स्वेच्छा निवृत्ती पत्करली. स्वेच्छा निवृत्तीनंतर मिळणारे आर्थिक लाभ व पेन्शनसाठी लागणारी सर्वच कागदपत्रे एसटी महामंडळाकडे सादर केली.  नियमांनुसार कमीत कमी एक वर्षाच्या त संबिंधत कर्मचार्‍यांना पेन्शन व इतर आर्थिक लाभ मिळणे आवश्यक होते, परंतु कागदपत्रांत कमीचे कारण देत ते प्रकरण बरेच लांबवले. असे असूनही सय्यद ताजअली यांनी ज्या कागदपत्रांची कमरता होती ती पूर्ण केली. रंतु आता सेवा पुस्तिका व रजा पुस्तिका मिळत नसल्याने सय्यद ताजअली यांना एसटी महामंडळाच्या खेट्या घालाव्या लागत आहेत.

तब्बल 14 वर्षे खेट्या मारूनही पेन्शन व इतर आर्थिक लाभ मिळत नसल्याने विशेष म्हणजे या कर्मचार्‍याने मिाहतीच्या इधकारात सेवा पुस्तिका व रजा पुस्तिका मिागतली होती. परंतु अद्यापही एसटी महामंडळ त्या कर्मचार्‍याला कागदपत्र द्यायलाही तयार नाही आणि पेन्शनचेही काम करायला तयार नाहीत. या बाबत इधकारी स्वेच्छा निवृत्ती स्वीकारलेल्या कर्मचार्‍यांबाबत किती गंभीर आहे हे समोर आले आहे. या अनागोंदी कारभारामुळे इमाने इतबारे सेवा बजावणार्‍या चालकावर उपासमारीची वेळ आली आहे.