सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचा सन्मान करा : SP वसंत परदेशी 

Last Updated: Nov 11 2019 1:33AM
Responsive image
जिल्हा पोलिस अधीक्षक वसंत परदेशी


वाशिम : प्रतिनिधी

येणाऱ्या काही दिवसात अयोध्या येथील अडीच एकर जागेचा अंतिम निकाल सुप्रीम कोर्ट देणार आहे. हा निकाल पूर्ण पणे देश हिताचाच असेल, तेव्हा या निकालाचा जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी आदरपूर्वक सन्मान करावा, असे आवाहन वाशिम जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष जिल्हा पोलिस अधीक्षक वसंत परदेशी यांनी केले आहे. ते आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.   

ते पुढे म्हणाले, या जागेच्या निकालासंदर्भात कोणत्याही व्यक्तीने अथवा जनतेने जल्लोष करू नये. हा फक्त जागेचा निकाल असून हे राम मंदिर किंवा मस्जिदीचा निकाल नाही. याची सुद्धा जनतेने भान ठेवावे. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. त्यामुळे सर्व सामान्य जनतेने काळजी करण्याचे कारण नाही.

त्याच बरोबर सोशल मिडिया (समाज माध्याम) यावर ही अंकुश लावण्यात आला आहे. त्यामुळे कोणीही कोणत्याच ग्रुपवर, फेसबुक वर किंवा संदेश पाठवून समाजाच्या भावना दुखविनाचा प्रयत्न करू नये. असे केल्यास समूह प्रमुख व संदेश पाठविणारा व्यक्ती यांच्यावर संयुक्त कारवाई केली जाईल. असा इशारा यावेळी जिल्हा पोलिस अधीक्षक वसंत परदेशी यांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून जनतेला दिला. या पत्रकार परिषदेला जिल्हा पोलिस अधीक्षक वसंत परदेशी, अतिरिक्त जिल्हा पोलीस अधीक्षक विजयकुमार चव्हाण, स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक शिवाजी ठाकरे यांची उपस्थिती होती.

राज्यात आणखी २०९१ रुग्ण सापडले, बाधितांची संख्या ५४,७५८


कोल्हापूरमध्ये आणखी पाच रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह


पुणे : एसआरपीएफच्या २० जवानांना कोरोनाची लागण


कोल्‍हापूर : चंदगडमध्ये संपत्‍तीसाठी सावत्र आईने मुलाला जाळून मारले 


जालना : शेततळ्यात बापासह मुलीचा बुडून मृत्यू


कोरोना उपचारातील 'हायड्रोक्सीक्लोरोक्वीन'बाबत 'आयसीएमआर'ने दिला 'हा' सल्ला


गोवा विद्यापीठाने पदवीच्या परीक्षा रद्द कराव्यात : एनएसयूआय


राज्यातील लघू उद्योगांना पॅकेज; तयारी अंतिम टप्प्यात : सुभाष देसाई


सांगली : पित्याने केला मुलाचा खून


श्रमिक ट्रेनवरुन पुन्हा एकदा केंद्रीय रेल्वेमंत्र्यांचा मुख्यमंत्री ठाकरेंवर निशाणा