होमपेज › Marathwada › जिल्ह्यात अफ वा जोरात; पोरं घरात

जिल्ह्यात अफ वा जोरात; पोरं घरात

Published On: Jun 21 2018 1:24AM | Last Updated: Jun 20 2018 10:57PMबीड : प्रतिनिधी

लहान मुलांना पळवून नेणारी टोळी फि रत असल्याची अफ वा सोशल मीडियाच्या माध्यमातून वेगाने फिरत असल्याने ग्रामीण भागात रात्रीच्या वेळी ग्रामस्थांकडून गस्त घातली जात आहे. शिरूर कासार तालुक्यातील आनंदगाव येथे  भांडी विकणार्‍या फेरीवाल्यांना  नागरिकांनी चोप दिला. ग्रामीण भागात रात्री उशिरा येणार्‍या लोकांची चौकशी केली जात आहे.  रात्रीच्या वेळी चोर मोठ्या संख्येने फिरत आहेत. लहान मुले पळवून नेणारी  टोळी गावात आल्याची अफवा पसरली जात असल्याने पालकांत दहशत आहे.

संशयावरून युवकास चोप

मुलांचे अपहरण केल्याच्या संशयावरून एका युवकास काहींनी बेदम मारहाण केली. ही घटना 19 रोजी परळीत रात्री घडली. पोलिसांनी हस्तक्षेप करत युवकाची सुटका केली. याची विचारपूस केली असता तो मतिमंद असल्याचे आढळून आले.